News

महाराष्ट्रामध्ये दूधउत्पादक शेतकऱ्यांना दुधाला रास्त दर मिळावा यासाठी रस्त्यावर उतरून झगडावं लागतं तर गुजरातमध्ये परिस्थिती वेगळी आहे. येथील दूध उत्पादकांना रास्त दर तर मिळतोच परंतु वर्षाला भाव फरकही दिला जातो. गुजरात मधील बनास जिल्हा दूध संघाने सभासद शेतकऱ्यांना तब्बल 19.12 टक्क्याचा भाव फरक दिला आहे.

Updated on 25 July, 2022 2:57 PM IST

 महाराष्ट्रामध्ये दूधउत्पादक शेतकऱ्यांना दुधाला रास्त दर मिळावा यासाठी रस्त्यावर उतरून झगडावं लागतं तर गुजरातमध्ये परिस्थिती वेगळी आहे. येथील दूध उत्पादकांना रास्त दर तर मिळतोच परंतु वर्षाला भाव फरकही दिला जातो. गुजरात मधील बनास जिल्हा दूध संघाने सभासद शेतकऱ्यांना तब्बल 19.12 टक्क्याचा भाव फरक दिला आहे.

जर आपण दूध संघाचा विचार केला तर तालुकास्तरावर दूध संघ तयार झाले त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या ब्रँडने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आले व त्यांच्यामध्ये विक्रीसाठी एकमेकांत स्पर्धा निर्माण झाली.

दूध वितरक, घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापाऱ्यांना जास्त कमिशन द्यावे लागले. पण हे त्यांना देण्यात येणारे कमिशन शेतकऱ्याच्या पैशांमधून वसूल केलं जाऊ लागलं.

नक्की वाचा:तज्ञांचे अनमोल मार्गदर्शन!पशु व्यवस्थापनात स्वच्छ पाणी आणि जनावरांचे आरोग्य यांचा आहे परस्पर संबंध,वाचा अनमोल माहिती

त्याचा परिणाम हा असा झाला की शेतकऱ्यांना जो काही दर मिळत होता तो कमी कमी होत गेला व मागील काही वर्षांपासून दुध दराचा प्रश्न खूप गंभीर स्वरूपाचा बनला आहे. अनेकदा आपल्याकडे दूध दरासाठी आंदोलने केले जातात.

 गुजरात मधील सहकारी मॉडेल

 गुजरात मध्ये एक आदर्श सहकारी मॉडेल उभे करून जिल्हा पातळीवरील जे काही दूध संघ आहेत त्यांना अमूल च्या छताखाली एकत्र आणला आणि राज्य पातळीवर अमुल ब्रॅंड तयार केला गेला.

नक्की वाचा:दूधउत्पादकांनो इकडे द्या लक्ष! जनावरांना चाऱ्यासोबत मीठ खाणे आहे खूप महत्वाचे; जाणून घ्या कारण...

त्यामुळेच गुजरात मधील काही दूध संघ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत त्यापैकीच एक आहे बनास कंठा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा होय. यात दूध संघाचे नाव बनास डेरी असे असून या डेअरीने प्रत्येक सभासद शेतकऱ्यांना 19.12 त्याचा भाव परत दिला आहे.

या भाव फरकापोटी  जवळजवळ शेतकऱ्यांना 1650 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. उदाहरणच द्यायचे झाले

तर जर एखाद्या शेतकऱ्याने एका वर्षात 14 लाख रुपये किमतीचे दूध संघाला दिले असेल तर शेतकर्‍याला दोन लाख 50 हजार रुपयांचा भावफरक मिळणार आहे.

गुजरात सरकारने दूध संघांमधील असलेली स्पर्धा संपवून केवळ वितरक आणि विक्रेते हे दोनच मध्यस्थ ठेवले व त्यांना देखील दोन ते तीन रुपये कमिशन ठरवून दिले त्यामुळे विक्रीही वाढली आणि पैसाही वाचला यातून शेतकऱ्यांना भावफरक  दिला जातो.

नक्की वाचा:Fantastic Technology: 'या' तंत्राचा वापर ठरेल कमी वेळेत सकस चारा निर्मिती साठी उपयुक्त,मिळेल जनावरांना पौष्टिक चारा

English Summary: banas dairy give 19.12 percent diffrent between rate to gujrat farmer
Published on: 25 July 2022, 02:57 IST