News

अनेकांनी आतापर्यंत सायकल या वाहनाचा वापर केलाच असणार. मात्र तुम्ही आतापर्यंत लोखंडापासून तसेच गँलोनाईजपासून बनवलेली सायकल वापरली असणार.

Updated on 12 June, 2022 4:14 PM IST

आपल्या आतापर्यंतचा अनुभव, नवनवीन कल्पनांचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कित्येकजण यश संपादन करत आहेत. अशीच एक सुंदर कल्पना साकारून पंढरपूर मधील एका व्यक्तीने सगळ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. अनेकांनी आतापर्यंत सायकल या वाहनाचा वापर केलाच असणार. मात्र तुम्ही आतापर्यंत लोखंडापासून तसेच गँलोनाईजपासून बनवलेली सायकल वापरली असणार.

मिसाळ हे पंढरपूर येथे राहणारे असून सध्या ते कामानिमित्त पुणे येथे नोकरी करत आहेत. यांनी पर्यावरणाला पोषक असणारी सायकलची निर्मिती केली आहे. बांबूपासून बनवलेली ही सायकल सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या सायकलीची पूर्ण बांधणी ही बांबूपासून बनवलेली आहे. रेझीन व नॅचरल फायबरपासून या सायकलची निर्मिती करण्यात आली आहे.

या सायकलीचा प्रवास ते गेली साडेचार वर्षे करत आहेत. त्यांनी या सायकलवरून हजारो किलोमीटरचा प्रवास केला आहे. नुकतीच त्यांनी एकादशीच्या निमित्ताने पुणे ते पंढरपूर असा प्रवास केला आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शन घेण्यासाठी त्यांनी पुणे ते पंढरपूर हा प्रवास बांबू पासून बनवलेल्या सायकलीवरून केला आहे. पुणे येथून ते त्यांच्या सायकलिस्टबरोबर पहाटे चार वाजता निघाले होते. दहा तासांमध्ये त्यांनी हा प्रवास पार केला. पुणे ते पंढरपूर हे जवळजवळ 250 किलोमीटरचे अंतर आहे.

काय सांगता! अच्छे दिन यावे म्हणून पठ्ठ्याने चक्क मुंगूसच पाळलं; वनविभागाने दाखवला हिसका

मिसाळ यांना डायबिटीज असून, गेली 25 वर्ष सायकलचा सराव असल्याने ते निरोगी आहेत. त्यामुळे ते सर्वांना सायकल वापरण्याचा सल्ला देत आहेत. बांबूपासून बनवलेल्या सायकलचे महत्व फार मोठे आहे. बांबूपासून बनवलेल्या सायकलचे महत्व सांगताना ते म्हणतात, सायकलला समोरून जरी कोणी धडक मारली तरी कुठलीही मोडतोड होत नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय ही सायकल वजनाने देखील हलकी आहे. सायकलचे वजन दहा किलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सायकलप्रेमींना तसेच शहरातील रहिवाशांना त्यांनी सायकलचे महत्व पटवून देऊन दररोज याचा वापर करण्याचा आग्रह केला आहे. सायकल चालवल्यामुळे संपूर्ण शरीर हे तंदुरुस्त राहते. शिवाय गुडघेदुखी तसेच बीपीचा आणि डायबिटीसचा कुठलाही त्रास होत नाही. सायकलप्रेमींनी जर एखादा लांबचा प्रवास करायचा असेल तर निश्चितच मार्गदर्शन करू आणि या सायकलबाबत योग्य मार्गदर्शन करू,असे त्यांनी आवर्जून सांगितले.

महत्वाच्या बातम्या:
भाज्यांचे दर शंभरी पार; वाचा नेमके आत्ताच का वाढले आहेत भाज्यांचे दर
एक असाही अवलिया; पाण्यासाठी खोदले 70 हून अधिक चर, देशाने घेतली नोंद

English Summary: Bamboo bicycles; It is also beneficial for health
Published on: 12 June 2022, 04:13 IST