सध्या राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना आता माजी मंत्री बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. ते गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे बोलले जात होते.
पुढील महिन्यात राज्यामध्ये दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग दारी अभियान राबवण्यात येणार आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले होते.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्रक काढून राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे आभियान राबवले जाणार असल्याचे जाहीर केले. यामुळे या संबंधीत कामे लवकर उरकणार आहेत.
त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बच्चू कडू यांची निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
सर्वात महाग आंब्याची शेती करून दोन भावांनी कमवले लाखो रुपये, किंमत ऐकून डोळे होतील पांढरे
यामुळे आता येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश असणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिंदे गटातील आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा जाहीर करू लागले.
पावसाळ्यात ही तीन पिके घ्या, 10 हजारांची गुंतवणूक करून लाखो रुपये कमवा..
यंदा दुष्काळजन्य स्थिती.? मान्सूनची गती मंदावली..
शेतकऱ्यांनो सोयाबीन उगवण क्षमता तपासणी कशी करावी, जाणून घ्या..
Published on: 24 May 2023, 01:51 IST