News

भारतात खरीप हंगामात (Kharif Season) मक्याची लागवड (Maize Farming) सर्वाधिक केली जाते. आपल्या राज्यातही खरीप हंगामात मक्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. खरं पाहता मका शेती शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न (Farmers Income) मिळवून देते. सध्या मक्याची शेती शेतकऱ्यांसाठी (Farmers) विशेष फायदेशीर ठरत आहे.

Updated on 13 May, 2022 10:49 PM IST

भारतात खरीप हंगामात (Kharif Season) मक्याची लागवड (Maize Farming) सर्वाधिक केली जाते. आपल्या राज्यातही खरीप हंगामात मक्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. खरं पाहता मका शेती शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न (Farmers Income) मिळवून देते. सध्या मक्याची शेती शेतकऱ्यांसाठी (Farmers) विशेष फायदेशीर ठरत आहे. 

यावर्षी मक्याला हमीभावापेक्षा (Maize MSP Price) अधिक दर मिळाल्याने येत्या खरीप हंगामात याची लागवड देखील आता वाढणार आहे. एकंदरीत, गहू आणि तांदूळ नंतर मका हे देशातील तिसरे महत्त्वाचे पीक म्हणून ओळखले जाते. मित्रांनो मक्याचे उत्पादन घेणारे शेतकरी (Maize Production) आता चांगले बक्कळ पैसे कमवत आहेत. याशिवाय सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत, मक्याची शेती अनेक प्रकारे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

याची शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकते. एवढंचं नाही मका उत्पादक शेतकरी बांधव बेबी कॉर्नचे देखील उत्पादन घेऊन चांगला बक्कळ नफा कमवू शकतात. यामुळे निश्चितच मका उत्पादकं शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया बेबी कॉर्न म्हणजे काय आणि शेतकरी बांधव त्याची लागवड कशी करू शकतात.

खरं काय! ड्रीप इरिगेशनसाठी 'इतकं' मिळतं अनुदान; वाचा याविषयी

अशा प्रकारे बेबी कॉर्न तयार होते

मित्रांनो बेबी कॉर्नचा वापर आपल्या देशात नव्हे-नव्हे तर संपूर्ण जगात मोठा झपाट्याने वाढतांना बघायला मिळतं आहे. यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे आणि त्याच्या अप्रतिम अशा चवीमुळे बेबी कॉर्नला म्हणजेचं मधुमक्याला मोठी बाजारपेठ आता तयार झाली आहे. त्याचबरोबर मधुमक्‍याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याला पाने गुंडाळलेले असल्याने कीटकनाशकांचा यावर कोणताही परिणाम होत नाही.

त्यामुळे हे पूर्णता रसायनविरहित आणि आरोग्याला अतिशय फायद्याचे असते यामुळे त्याची मागणीही खूप आहे. अशा परिस्थितीत, बेबी कॉर्न कसे तयार होते हे प्रथम जाणून घेणे आवश्यक आहे. मूलतः बेबी कॉर्न हा मक्याचा प्रारंभिक टप्पा असतो, ज्याला अपरिपक्व मका किंवा बेबी कॉर्न असेही म्हणतात. मका पिकात कणीस आल्यानंतर ठराविक वेळेत ज्या मक्याची काढणी केली जाते त्याला मधुमका म्हणून ओळखले जाते.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' सरकारी योजनेमध्ये 95 रुपये गुंतवणूक करा आणि मिळवा तब्बल 14 लाख; वाचा याविषयी

वर्षभरात 4 पिके, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पण सुटतो 

बेबी कॉर्नचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. कृषी तज्ञांच्या मते बेबी कॉर्न लागवड केल्यानंतर केवळ दोन महिन्यात काढणीसाठी तयार होतं असतो. अशा प्रकारे शेतकरी एका वर्षात बेबी कॉर्नची 4 पिके घेऊ शकतात आणि चांगले बक्कळ पैसे छापू शकतात.

ज्यामध्ये शेतकरी एकरी 4 ते 6 क्विंटल बेबी कॉर्नचे उत्पादन घेऊ शकतात. दुसरीकडे मका पिकातून बेबी कॉर्न काढल्यानंतर जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्थाही सहज होते. शेतकरी 80 ते 160 क्विंटल हिरवा चारा यातुन मिळवू शकतात. निश्चितच मधुमक्‍याची शेतकऱ्यांना दुहेरी फायदा देणारी सिद्ध होणार आहे.

बेबी कॉर्नची काढणी केव्हा अन कोणते बियाणे आहे उपयुक्त बेबी कॉर्नची लागवड दक्षिण भारतात वर्षभर करता येते, तर उत्तर भारतात फेब्रुवारी ते नोव्हेंबर दरम्यान बेबी कॉर्नची लागवड करता येते. मका संशोधन संचालनालय, पुसा यांच्या अहवालानुसार, बेबी कॉर्नचे उत्पादन सामान्य मक्याच्या लागवडीसारखेच आहे, परंतु काही विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्याने बेबी कॉर्नच्या उत्पादनासाठी मक्याच्या एकाच क्रॉस हायब्रीड जातीची पेरणी करावी. शेतकरी एक हेक्टरमध्ये 20 ते 24 किलो बियाणे वापरू शकतात.

मक्याला तुरे किंवा रेशीम आल्यानंतर 24 तासांच्या आत कापणी करावी. या अवस्थेत काढला गेलेला मका मधुमका म्हणून ओळखला जातो. काढणी करताना रेशमाची लांबी 3 ते 4 सेमी असावी. काढणीनंतर पाने काढू नये तसेच राहू द्यावे यामुळे बेबी कॉर्न बराच काळ ताजे राहतात.

Mansoon 2022: शेतकऱ्यांनो सुरु करा खरीपाची तयारी; मान्सून वेळेआधीच आगमनाच्या तयारीत; वाचा IMD चा ताजा अंदाज

कॅनडातून बेबी कॉर्नची मागणी

बेबी कॉर्नमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. ज्यामध्ये मुख्यतः कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. त्याच वेळी, ते कच्चे किंवा भाजून खाल्ले जाऊ शकते. या गुणांमुळे बेबी कॉर्नने स्वतःची बाजारपेठ विकसित केली आहे. विशेष म्हणजे कॅनडाने बेबी कॉर्नच्या आयातीसाठी भारत सरकारशी करार केला आहे. यामुळे निश्चितचं या खरीप हंगामात मधुमक्‍याची शेती शेतकऱ्यांना फायदा देणारी ठरणार आहे.

English Summary: baby corn farming will be a boon for farmers during the kharif season; Learn valuable information about baby corn farming
Published on: 13 May 2022, 10:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)