राज्यातील विकासकामांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केलंय. या अगोदर दसरा मेळाव्याच्या भाषणावरून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. शिंदे सरकारच्या गलथान कारभारावर अजित पवार यानी ताशेरे ओढले आहेत.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या आणि माळेगाव येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ झाला. यानिमित्तानं आयोजित शेतकरी मेळाव्यात कारखान्याचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच काय चाललंय याकडे लक्ष देऊ नका, त्यापेक्षा आपल्या शेतात कामात लक्ष द्या. अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद गेलं आता त्याचं काय होणार?, असा विचारचं करू नका, अजित पवार तेव्हा पण काम करत होता आणि आताही काम करत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंनी सांगितली पक्षाची तीन नावं, तीन चिन्ह; पाहा कोणती आहेत नावं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वाखालील राज्यातील सरकारने लोकशाहीचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. अधिकाऱ्यांनाही कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही, हे कळत नाही. अशा राजकीय स्थितीमुळेच राज्यातील विकासकामांवर परिणाम होत असल्याचंही अजित पवार म्हणालेत.
ऊसाला प्रतिटन 4 हजार रूपये भाव द्या अन्यथा ऊसतोड नाही; मोठा निर्णय
अजित पवार म्हणाले, साखर उद्योगातील अडचणींबाबत केंद्र आणि राज्य सरकारनं योग्य धोरण आखणं आवश्यक आहे. त्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करून शेतकऱ्यांचं हित जोपासत राहू अशी ग्वाही यावेळी दिली.
उत्तर प्रदेशचे हित डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार साखर निर्यातीचा कोटा कारखान्यांना निश्चित करून देत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे आर्थिक नुकसान होत आहे.
सोमेश्वरची गाळप क्षमता ८५०० टन प्रतिदिन इतकी होणार असल्यानं ३६ मेगावॅटपर्यंत सहवीज निर्मिती प्रकल्पाची विस्तारवाढ गरजेची आहे. बारामतीत सोमेश्वरपेक्षा माळेगावची रिकव्हरी थोडीशी अधिक आहे.
माळेगावनं गेटकेन व सभासदांना वेगवेगळा दर दिला. सोमेश्वरनं एकसारखा दर दिला. रिकव्हरीत सुधारणा होण्यासाठी नोंदीनुसारच ऊस गाळपाला आणावा. त्यात वशिलेबाजी नसली पाहिजे, अशी अपेक्षा मेळाव्यात व्यक्त केली.
ओडिशाचे सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार
Published on: 09 October 2022, 07:37 IST