News

पुणे येथील कृषी महाविद्यालयात गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित पवार यांनी सर्व स्टॉल व गोठ्याला भेट देऊन पाहणी केली.

Updated on 27 May, 2022 11:44 AM IST

पुणे येथील कृषी महाविद्यालयात गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित पवार यांनी सर्व स्टॉल व गोठ्याला भेट देऊन पाहणी केली.

राजकारणात येण्यापूर्वी शेतकरी आणि दूध उत्पादक म्हणून काम केल्याचे अजित पवार यांनी आपल्या भाषणात अनेकदा सांगितले आहे. त्याचा प्रत्यय आज येथील अधिकाऱ्यांनी पाहिला. अजित पवार कार्यक्रमस्थळी येताच ते गोठ्यात गेले. आतील जमिनीची पातळी समांतर नव्हती. अनेक ठिकाणी बांबू तुटले होते. पवार म्हणाले, "अरे, काय काय केलंस? मला सांगा, किती खर्च (निधी) पाहिजे. पुरवण्या मागण्यांमध्ये करून देतो.

तुम्ही अधिकार्‍यांनी मला बोलवताना दहावेळा विचार करा. मी तुमचा पंचनामा करेन की कौतुक करेन. माझा काटेवाडीचा आणि बारामतीचादेखील गोठा येऊन पहा. आवड पाहिजे, आवड असल्याशिवाय काही होत नाही,”  असे अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.  

गेल्या ४० वर्षांपासून चारा प्रकल्पाच्या यंत्रावर काम करणाऱ्या छबुबाई कामठे आणि इतर तीन महिला प्रदर्शनाच्या ठिकाणी होत्या. त्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून ती तिच्या प्रोजेक्टजवळ उभी होती. अजित पवार त्यांच्या प्रकल्पाजवळ आले असता, तेथील महिलांनी फोटोसाठी आग्रह धरला.

त्यावर अजित पवार म्हणाले कुठल्या तुम्ही, आज एकदम नटून थटून आलात, हातावर मेहंदी पण काढली असे म्हणताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकला. अजित पवारांच्या शेजारी असलेल्या छबुबाई कामठे म्हणाल्या, "दादा, मी सासवडची असून 40 वर्षांपासून काम करत असून, माझा पगार ४० हजार आहे. यानंतर अजित पवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या स्टॉलवर गेले.

महत्वाच्या बातम्या
राज्याची जागतिक ओळख निर्माण करण्यासाठी भौगोलिक मानांकन महत्त्वाचे घटक : अजित पवार

साखर निर्यात बंदीच्या निर्णयावर राजू शेट्टी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

English Summary: As soon as he reached the inauguration, Ajit Pawar told the officials, what have you done?
Published on: 27 May 2022, 11:44 IST