News

सोलापूर: भारत हा अनेक किस्से आणि जुगाडांनी भरलेला देश आहे. त्यामुळे भारतात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडलेल्या ऐकायला मिळतात. चोरीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील मात्र सोलापूरमधील एका पठ्याने स्वतःची बाईक चोरीला गेली म्हणून तब्बल २९ गाड्या चोरल्या होत्या.

Updated on 04 September, 2022 1:40 PM IST

सोलापूर: भारत (India) हा अनेक किस्से आणि जुगाडांनी भरलेला देश आहे. त्यामुळे भारतात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडलेल्या ऐकायला मिळतात. चोरीच्या (theft) अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील मात्र सोलापूरमधील (Solapur) एका पठ्याने स्वतःची बाईक चोरीला गेली म्हणून तब्बल २९ गाड्या चोरल्या होत्या.

या प्रकरणी सोलापरमधून पोलिसांनी (Solapur Police) बाईक चोराला आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. सोलापूर पोलिसांनी नुकताच गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळक्याकडून पोलिसांनी एक दोन नव्हे तर तब्बल २९ गाड्या जप्त केल्या आहेत.

सोलापरमधील मार्केट यार्ड परिसरात दुचाकी चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडत होत्या. तसेच या घटनांमध्ये वाढही झाली होती. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी सापळा रचत दुचाकी चोरणाऱ्या (bike thief) टोळीचा छडा लावला आणि त्यांना ताब्यात घेतले आहे. सोलापूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचने दुचाकी चोरांना पकडले आहे.

भारीच की! iPhone 12 वर मिळत आहे 25 हजार रुपयांहून बंपर सूट; पहा ऑफर...

सोलापूर क्राईम ब्रांच पोलिसांनी एका संशयित चोरट्याचा तपास सुरु केला होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या इतर साथीदारांची कसून चौकशी सुरु केली. यानंतर या चोरट्याच्या अन्य दोघा जणांची माहिती मिळवत पोलिसांनी त्यांनाही अटक केली.

एकूण तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून त्यांनी चोरी केलेल्या दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्यात. तब्बल 29 दुचाकी या तिघा जणांच्या टोळीने चोरल्या होत्या.

"शिंदे यांच्याविरोधात पातळी सोडून बोलाल तर चून चून के, गिन गन के मारे जायेंगे"

दुचाकी चोरणाऱ्या टोळक्याच्या प्रमुखाची गाडी मार्केट यार्ड परिसरातून चोरीला गेली होती. त्याच्याच रागात मित्रांच्या मदतीने या चोराने २९ दुचाकी चोरल्या होत्या. पोलिसांच्या चौकशीत या चोराने याची कबुली दिली आहे. या कारवाईत एकूण 8 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ,सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी या संपूर्ण चोरीप्रकरणाची माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या:
CNG Cars: संधीच करा सोनं! या वेबसाइटवर मिळतायेत सर्वात स्वस्त सीएनजी कार...
EPFO: व्यवसाय करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शन; EPFO ​​ची योजना

English Summary: As his own bike was stolen, stole as many as 29 bikes
Published on: 04 September 2022, 01:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)