शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कारवाई हा लोकशाहीचा, विरोधकांचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. हे कारस्थान लज्जा सोडून आहे. जो हिंदूंचा, मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करतोय, त्याचाच गळा घोटण्याचा डाव आहे.
तसेच शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरोधात लढत राहू. महाराष्ट्राची माती काय असते, तिथला पराक्रम काय असतो, हे दाखवून देऊ, असेही ते म्हणाले. पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापेमारी केली.
दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगितले गेले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली, यामुळे आता शिवसेना आक्रमक झाली आहे.
वाईमध्ये ढगफुटीदृश्य पाऊस, शेतकऱ्यांसह घरांचे मोठे नुकसान
तसेच आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. सर्व कागदपत्रे चार्टर्ड अकाउंटंटकडे आहेत. ती कागदपत्रे मी प्राप्तिकर विभागालाही दिल्याची माहिती राऊत यांनी दिली. यामुळे आता ईडीविरोधात शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊत हे भाजपवर निशाणा साधत होते.
शेतकऱ्यांनो गाजर गवताचा करा कायमचा नायनाट, जाणून घ्या सोप्पी पद्धत..
तसेच मोदींवर देखील त्यांनी टीका केली, यामुळे ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. कोणत्याही घोटाळ्याची संबंध नाही. मी झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही. मरेन, पण शरण जाणार नाही. खोटे आरोप, खोटी कागदपत्रे दाखवून कारवाई केली जात आहे, असेही राऊत यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या;
संजय राऊतांच्या अटकेनंतर घरात सापडली तब्बल 'इतकी' रक्कम, कागदपत्रेही नाहीत..
लाखोंचा पोशिंदा अडचणीत, नियम बाजूला ठेवून मदत करा, आता करायचे काय अजितदादांनी दिला सल्ला
राज्यातील बड्या राजकीय नेत्यांना धक्का, साखर आयुक्तांनी पैसे थकवल्याप्रकरणी दिल्या नोटीस..
Published on: 01 August 2022, 01:01 IST