केळी म्हटले म्हणजे पटकन डोळ्यासमोर जळगाव जिल्हा येतो. जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार म्हटले जाते. जळगाव जिल्ह्यामध्ये केळी उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर होते.
महाराष्ट्राचा एकंदर विचार केला तर, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केळीचे उत्पादन घेतले जाते. या जिल्ह्यांमध्ये जळगाव नंतर नांदेड जिल्ह्याचा क्रमांक लागतो.
जर आपण नांदेड जिल्ह्याच्या केळीचा विचार केला तर त्या ठिकाणची अर्धापूरची केळी भारतातच नव्हे तर विदेशात देखील प्रसिद्ध असून तिला चांगली मागणी आहे.
नक्की वाचा:फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर पुनर्फवारणी ही खालील घटकांवर अवलंबून असते
या सगळ्या पार्श्वभूमीवर केळीची बाजारपेठेत प्रचंड प्रमाणात मागणी आहे त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने देशांतर्गत बाजारपेठेत केळीला 2000 ते 2200 रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. हा जो दर मिळाला आहे हा आतापर्यंतचा सर्वात जास्त भाव असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अजून केळीची निर्यात जर सुरु झाली तर आणखी भाव वाढ होण्यास मदत होईल अशी शक्यता केळी व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
एकंदरीत आपण नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरच नव्हे तर भोकर आणि मुदखेड येथील दोघा तालुक्यात देखील प्रामुख्याने केळी चे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
सद्यपरिस्थितीत नांदेड जिल्ह्यात एकंदरीत पंधरा हजार हेक्टरवर केळी पिकाची लागवड आहे.मागच्या वर्षी अतिवृष्टी होऊन इतर पिकांसोबतच केळी पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
नक्की वाचा:पावसाळ्यात 'या' पिकांची शेती करा, लाखोंची कमाई होणार, कसं ते वाचा
जास्त पाऊस झाल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात केळी पिकावर झाला होता. त्यामुळे अक्षरशः शेतकऱ्यांनी केळी कापून घेतली होती. मध्यंतरी काळाचा विचार केला तर मध्य प्रदेश, बऱ्हाणपूर, हिंगोली,
जळगाव आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वार्यांनी केळीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. जर मागच्या दोन ते तीन वर्षाचा विचार केला तर केळी उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला आहे.
परंतु आता मागणी चांगली वाढली असून त्या मानाने पुरवठा कमी होत असल्याने केळीच्या दरात सुधारणा पाहायला मिळत असून विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. इतिहासात पहिल्यांदाच इतका भाव केळीला मिळाला असून अगोदर केळीचा एक घड 250 ते 300 रुपयांना विकला जात असे.
जर आपण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर विक्रीचा विचार केला तरीही अर्धापूर या नावाची केळी देशभर प्रसिद्ध असून केळी खायला चविष्ट आणि साठवायला देखील टिकाऊ असून कमीत कमी आठ दिवस चांगले टिकते.
नक्की वाचा:मुकेश अंबानी आहेत आंब्याचे मोठे निर्यातदार; शेतकऱ्यांनाही होतोय फायदा
Published on: 04 July 2022, 02:09 IST