प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याचे नुकतेच प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये राज्यातील पात्र 97 लाख शेतकऱ्यांपैकी 12 लाख शेतकरी चौदाव्या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत.
प्रामुख्याने भूमिअभिलेख नोंद अद्ययावत नसणे, ई-केवायसी केलेले नसणे, बँक खाते आधारशी संलग्न नसणे या काही अटींची पूर्तता न केल्याने हे 12 लाख शेतकरी वंचित राहिले आहेत.
या सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा तसेच राज्य शासनाच्या नमो किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा यासाठी वरील तीनही अटींची पूर्तता करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व भूमिअभिलेख अधिकारी यांची संनियंत्रण समिती करण्यात आली आहे.
त्यांच्या देखरेखीखाली गाव पातळीवर कृषी सेवक, तलाठी व ग्रामसेवक या अटींची पूर्तता प्रत्यक्ष लाभार्थींकडून करून घेतील, ही विशेष मोहीम 15 ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांच्या वरील अटींची पूर्तता करण्याचे बाकी राहिले आहे. त्यांनी संबंधित समितीशी संपर्क करून आपले भूमिअभिलेख अद्ययावत करणे, ई-केवायसी करणे, बँक खात्याशी आधार संलग्न करणे आदी अटींची पूर्तता करून आपले नाव निश्चित करून घ्यावे.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची आढावा बैठक संपन्न, बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय..
मोदी सरकारकडून देशातील शेतकरी बांधवांना आर्थिक मदत म्हणून वर्षभरात 6 हजार रुपयांचे तीन हप्ते जाहीर केले जातात. याअंतर्गत चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले जातात.
कांद्याचे भाव क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी वाढले, शेतकऱ्यांना दिलासा...
'साखर कारखान्यांनी आर्थिक शिस्त आणावी, गैरव्यवहार टाळण्याची दक्षता घ्या, खरेदीमध्ये पारदर्शकता आणा'
Published on: 14 August 2023, 11:46 IST