News

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे नेहेमी चर्चेत असतात. दिल्लीत त्यांनी केलेले आंदोलन मोठे गाजले होते, तसेच या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला होता. असे असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. अण्णा हजारे (Anna Hazare) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरुद्ध (Corruption) नारा देण्याच्या तयारीत दिसत आहेत.

Updated on 08 June, 2022 5:11 PM IST

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे नेहेमी चर्चेत असतात. दिल्लीत त्यांनी केलेले आंदोलन मोठे गाजले होते, तसेच या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला होता. असे असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. अण्णा हजारे (Anna Hazare) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरुद्ध (Corruption) नारा देण्याच्या तयारीत दिसत आहेत. यासाठी त्यांनी 'नॅशनल पीपल्स मूव्हमेंट' ( NPM ) ही नवी संघटना स्थापन केली असून, याची अधिकृत घोषणा ते 19 जून रोजी करणार आहेत.

यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. अण्णा हजारे 19 जून रोजी दिल्लीत येत आहेत, जिथे ते त्यांच्या नवीन संघटनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अण्णा हजारे यांनी कोणताही राजकीय पक्ष स्थापन केलेला नाही आणि आजपर्यंत कोणत्याही राजकीय संघटनेशी संबंध ठेवलेला नाही. यापूर्वी त्यांनी कोणत्याही प्रकारची संघटना स्थापन केली नव्हती, पहिल्यांदाच त्यांनी लोकआंदोलन संघटना स्थापन केली असल्याचे त्यांचे सहकारी भोपाल सिंह यांनी सांगितले.

त्या माध्यमातून ते भ्रष्टाचाराविरोधात काम करणार आहेत. तसेच राष्ट्रीय लोक आंदोलन संघटनेचे अध्यक्ष अण्णा हजारे आहेत. अण्णा हजारे झोपले आहेत, दिसत नाहीत, असे लोकांकडून बोलले जात होते. यासोबतच काही लोक त्यांना कधी भाजपचे एजंट म्हणतात, तर कधी काँग्रेसचे एजंट. यामुळे अनेकदा टीका झाली आहे.

शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र, साखर कारखान्यांबाबत म्हणाले..

अण्णा हजारे हे समाजसेवक आहेत हे लोक विसरतात. राजकारण करणारेच रस्त्यावर दिसतात, ते राजकारण करत नाहीत. देशाला ज्यावेळी अण्णा हजारेंची गरज असेल, तेव्हा अण्णा हजारे घरातून बाहेर पडतील, असेही भोपाल सिंह यांनी म्हटले आहे. ही एकमेव सामाजिक संघटना आहे ज्यात देशभरातील सामाजिक संघटना अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या;
घोडगंगाच्या मतदार यादीत मृत सभासदांची नावे, कारखान्याने सर्वे केलाच नाही
आता रेशनच्या दुकानातही मिळणार भाज्या आणि फळे, विक्रीला परवानगी
शेतकऱ्यांनो उसाची नोंदणी झाली नसेल तर काळजी करू नका, साखर आयुक्तालयाने घेतला मोठा निर्णय

English Summary: Anna Hazare announce union soon? Discussions abound
Published on: 08 June 2022, 05:11 IST