News

हिंगोली: अनेक बाबींपासून लहान ज्यांना सुविधा त्याचे पाहिजे तसे लाड शेतकरी आपल्या मुलांचे पुरवू शकत कारण त्याची सर्वात मोठी अडचण म्हणजे पैसा आहे. अशाच एका शेतकऱ्याच्या लहान मुलाने आपल्या परिवाराच्या वेदना मांडत एक पत्र चक्क मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल सुद्धा होत आहे.

Updated on 10 October, 2022 9:52 AM IST

हिंगोली: अनेक बाबींपासून लहान ज्यांना सुविधा त्याचे पाहिजे तसे लाड शेतकरी आपल्या मुलांचे पुरवू शकत कारण त्याची सर्वात मोठी अडचण म्हणजे पैसा आहे. अशाच एका शेतकऱ्याच्या लहान मुलाने आपल्या परिवाराच्या वेदना मांडत एक पत्र चक्क मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल सुद्धा होत आहे.

एका शेतकऱ्याच्या इयत्ता सहावीतील मुलाने यावर्षी पावसाने सोयाबीन गेल्याने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत,अशी खंत व्यक्त केली आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम होता.

ढगफुटी व सततच्या पावसामुळे सर्वत्र शेतजमिनी खरडून गेली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. बिकट परिस्थितीत शासनाच्या मदतीची अपेक्षा असताना सेनगाव तालुक्यातील चार मंडळे अतिवृष्टी अनुदानातून वगळल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.

Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांकडे लक्ष देऊ नका, आपल्या शेतात कामात लक्ष द्या"

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा प्रताप जगन कावरखे याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. सणाला पोळ्या तर सोडा साधे गुपचूपसाठी पण पैसे सध्या नाहीत. जवळच्या जयपूर गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाने पैसे मागितल्यामुळे फाशी घेतली.

उद्धव ठाकरेंनी सांगितली पक्षाची तीन नावं, तीन चिन्ह; पाहा कोणती आहेत नावं?

तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुखी ठेवावे आणि अनुदान लवकर द्यावे, असेही पत्रात नमूद केले आहे. याच्या या पत्रामुळे सध्या यावर चर्चा सुद्धा त्याच प्रकारे रंगते आहे. त्यामुळे खरंच या चिमुकल्याची आर्त हाक मुख्यमंत्र्यांच्या कानी पडणार का...? कितपत मुख्यमंत्री या पत्राकडे लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ऊसाला प्रतिटन 4 हजार रूपये भाव द्या अन्यथा ऊसतोड नाही; मोठा निर्णय

English Summary: An emotional letter from a farmer's child to the Chief Minister
Published on: 10 October 2022, 09:36 IST