News

Amul Milk Price Hike: गेल्या काही दिवसांपासून दूध दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे अच्छे दिन आले आहेत. दूध उत्पादनात घट होत असल्याने दुधाचे दर वाढत आहेत. अमूलने दुधाच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. कंपनीने दिल्लीत लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे.

Updated on 15 October, 2022 2:00 PM IST

Amul Milk Price Hike: गेल्या काही दिवसांपासून दूध (Milk) दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) अच्छे दिन आले आहेत. दूध उत्पादनात (milk production) घट होत असल्याने दुधाचे दर वाढत आहेत. अमूलने (Amul) दुधाच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. कंपनीने दिल्लीत लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे.

फुल क्रीम दूध आता ६१ ऐवजी ६३ रुपये प्रतिलिटर झाले आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. यापूर्वी 17 ऑगस्टपासून अमूल दुधाच्या (Amul Milk) दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

मुसळधार पावसाने मोडले सोयाबीन उत्पादकांचे कंबरडे! पावसामुळे सोयाबीन खराब; शेतकरी संकटात

गुजरात वगळता देशभरात दर वाढले आहेत

कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की त्यांनी आपले फुल क्रीम दूध आणि म्हशीच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. दुधाच्या दरात ही वाढ गुजरात वगळता सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी करण्यात आली आहे. अमूलने तिसऱ्यांदा अशाप्रकारे दुधाच्या दरात वाढ केली आहे. मात्र, दुधाच्या दरवाढीबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

दिवाळीच्या मुहूर्तावर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या दरात काय झाला बदल...

याआधी दुधाचे भाव कधी वाढले?

अमूल आणि मदर डेअरीने याआधी ऑगस्टमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर दरवाढीची भरपाई देण्याच्या नावाखाली दुधाच्या दरात वाढ करण्यात आली. यापूर्वी मार्च महिन्यात दुधाचे दर वाढले होते. आज पुन्हा भाव वाढले आहेत.

सणांच्या आधी हा निर्णय सर्वसामान्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. देशातील सर्वाधिक खाल्ल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांपैकी दूध हे एक आहे. त्याचबरोबर या दरवाढीमुळे लोकांच्या बजेटवर परिणाम होणार असल्याचेही बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांना दुहेरी फटका! एकीकडे पावसाचा कहर तर दुसरीकडे सोयाबीनच्या भावात घसरण; जाणून घ्या सोयाबीनचे दर
सुवर्णसंधी! दिवाळीच्या तोंडावर सोने 5700 रुपयांनी स्वस्त; पहा 14 ते 24 कॅरेटचे दर

English Summary: Amul Milk Price Hike: Milk price hiked by Rs 2; Big decision by Amul
Published on: 15 October 2022, 02:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)