News

शेतकरी सध्या अनेक अडचणीचा सामना करत आहे. यातच सध्या राज्यातील निम्म्या साखर कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे. या कारखान्यांनी थकवलेली एफआरपी तब्बल 850 कोटींच्या घरात आहे. सर्वाधिक एफआरपी थकीत ठेवणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये दोन कारखाने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील आहेत.

Updated on 25 May, 2023 1:09 PM IST

सध्या राज्यातील निम्म्या साखर कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे. या कारखान्यांनी थकवलेली एफआरपी तब्बल 850 कोटींच्या घरात आहे. सर्वाधिक एफआरपी थकीत ठेवणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये दोन कारखाने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील आहेत.

कर्मवीर साखर कारखान्याची 94.50 कोटींची थकबाकी असून नीरा भीमा कारखान्याची 71.93 कोटींची थकबाकी आहे. एफआरपी थकवणाऱ्या 9 कारखान्यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळणार तरी कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात 210 साखर कारखान्यांमध्ये नुकताच ऊस गळीत हंगाम पार पडला. यामध्ये 105 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना 100 टक्के एफआरपी दिली आहे. मात्र, उर्वरित कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत.

बच्चू कडूंना मिळाला मंत्रिमंडळाचा दर्जा, राज्य सरकारचा मोठा निर्णय...

साखर कारखान्यांकडून ऊस गळीत हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे देण्याची शिफारस ऊस दर नियंत्रण समितीकडून करण्यात येते. मात्र, ही समितीच अस्तित्वात नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर ही वेळ ओढावली आहे.

12 वी च्या निकालाची तारीख ठरली! उद्याच लागणार ऑनलाइन निकाल

दरम्यान, बहुतांशी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पहिल्या उचलीपोटी एकरकमी एफआरपीची रक्कम देण्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव वाढले असतानाही अनेक कारखान्यांकडून एफआरपी थकित राहिली आहे.  
शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर FRI दाखल करा, देवेंद्र फडणवीसांचे थेट आदेश..
कांदा निर्यातीत मोठी वाढ, दरांकडे शेतकऱ्यांचे लक्ष...

English Summary: Among the sugar mills with the highest FRP arrears, the first 2 mills are from Indapur....
Published on: 25 May 2023, 01:09 IST