विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगरमधील कृषी केंद्राना भेट दिली. त्यांनी बियाणे व खतांची विक्री व साठा तपासणी करीत योग्य दरात बियाणे विक्रीचे करण्याचे निर्देश देण्यात आले.
यंदा कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही. याची दक्षता कृषी विभागासह कृषी केंद्र चालकांनी घ्यावी. खत व बियाण्यांची चढ्या दराने विक्री केली जात आहे.
असा प्रकार करणाऱ्यांसह बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे दानवे यांनी सांगितले. दरम्यान, खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यभरात ठिकठिकाणी बोगस बियाणे, खतांच विक्री तसेच काळाबाजार होत आहे.
दूध दर आंदोलन पेटले! सांगोल्यात रास्ता रोको, शेतकरी अडचणीत..
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कृषी केंद्राला भेट दिल्यानंतर दानवे यांनी केंद्रातील बियाणे साठा व विक्री यासह वेगवेगळ्या खाते बुकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचीही भेट घेतली.
1 जुलैपासून शेतकरी जनजागृती अभियान, राजू शेट्टी करणार रायगडावर मोठी घोषणा
शेतकऱ्यांशी दानवे यांनी चर्चा करुन त्यांना बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला दिला. तसेच चांगला पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये असे सांगितले.
आता वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण
दुग्धव्यवसायाला मिळते गती, हे यंत्र अनेकांची कामे मिनिटांत करते, जाणून घ्या...
कारखानदारांनो एफआरपी कधी देणार? पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे १८९ कोटींची एफआरपी थकित
Published on: 26 June 2023, 10:37 IST