News

महावितरणचा गजब कारभार हा सुरूच आहे. शेतात वीज जोडणी नसताना देखील शेतकऱ्याला वीज बिल आले आहे. महावितरण कंपनी नेहमी विविध कारणाने चर्चेत असते. अनेकवेळा शेतकर्‍यांच्या कृषीपंपाला विज जोडणी न देताच महावितरण कंपनीकडून अनेक शेतकऱ्यांना वीज बिले येत असतात.

Updated on 07 April, 2022 4:59 PM IST

महावितरणचा गजब कारभार हा सुरूच आहे. शेतात वीज जोडणी नसताना देखील शेतकऱ्याला वीज बिल आले आहे. महावितरण कंपनी नेहमी विविध कारणाने चर्चेत असते. अनेकवेळा शेतकर्‍यांच्या कृषीपंपाला विज जोडणी न देताच महावितरण कंपनीकडून अनेक शेतकऱ्यांना वीज बिले येत असतात. असाच प्रकार पुन्हा एकदा घडला आहे.

वर्धा जिल्ह्यातील वडनेर बोपापुर येथे विद्युत जोडणी न करताच शेतकऱ्याला वीज बिल आले आहे. बोपापूर येथील शेतकरी मनोहर रामचंद्र झाडे यांची बोपापूर शिवारात सहा एकर शेती आहे. थेट 20 हजार 180 रुपयांचे अवाजवी वीज बिल आले आहे. महावितरणच्या या अजब कारभारानं शेतकऱ्याला अडचणीत टाकलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
Milk Rate : शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! दूध दरात तब्बल 'इतकी' वाढ
खुशखबर! शेतकऱ्यांचा शेतीमाल बांधावरून थेट सातासमुद्रापार जाणार, असा घ्या योजनेचा लाभ..!

काय आहे प्रकरण?

वर्षाला किमान तीन पिके घेता यावी, म्हणून त्यांनी शेतात बोअरवेल घेतला आहे. कृषीपंपाच्या विद्युत जोडणीसाठी महावितरणकडे रीतसर अर्जही केला. जुळवाजुळव करुन 6 हजार 807 रुपयांचा डिमांड भरला. परंतू, अद्यापही शेतातील कृषीपंपासाठी विद्युतजोडणी झाली नाही. महावितरणकडून विद्युत मीटरही बसवण्यात आलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या :
धरणग्रस्तांना मिळणार हक्काची जमीन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
सोयाबीनला अच्छे दिन..! दरात झाली 'इतकी' वाढ; शेतकऱ्यांना होणार फायदा

तरीही पाच महिन्यांनी 20 हजार रुपयांचे ज्यादाचे वीज बिल आल्याची घटना घडली आहे. मनोहर रामचंद्र झाडे असे त्या शेततऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्यला विद्युत जोडणी न देताच वीज बिल आल्याने शेतकऱ्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहेत.

English Summary: Amazing management of MSEDCL, so many bills came to the farmers
Published on: 07 April 2022, 04:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)