राज्यातील साखर कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. यामुळे सहकार देखील बुडून खाजकीकरण झाल्याचे सांगितले गेले. असे असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. आम्हा काही लोकांच्या बदनाम्या व्हायच्या त्या झाल्या. वेगवेगळ्या पद्धतीने एसीबी, सीआयडीच्या चौकशा झाल्या.
सहकार खात्याच्या चौकशा केल्या गेल्या. मात्र साखर कारखान्यांच्या बाबतीत कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. काही बाबतीत अनियमितता झाली, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. आजही 12 कारखाने राज्य सहकारी बँकेला चालवायला द्यायचे आहे. ज्याच्यात धमक असेल त्याने जावं असे आव्हानच त्यांनी दिले आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
जाणीवपूर्वक काही जण म्हणतात की ठराविक लोकांची मक्तेदारी आहे. पण कारखाने चालवणं हे काही येड्यागबाळ्याचं काम नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील बंद पडलेले साखर कारखाने काही जण चालवायला घेतात. काही जण आरोप करतात की हेच कसे चालवतात. राज्यकर्ते एखादी शुगर फॅक्टरी वाचवण्यासाठी आउट ऑफ वे जाऊन काम करतात.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितले की साखर कारखान्यांना हमी देण्याचं प्रकरण आमच्याकडे आणू नका, ज्याने त्याने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं, असेही पवार यांनी सांगितले. नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या अंबड शाखेचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी छगन भुजबळ देखील उपस्थित होते.
तसेच मी राज्यात जिथे सहकार विभागाच्या कार्यक्रमात जातो आणि तिथे त्यांनी खूप मोठा चांदीचा वजनदार पुरस्कार दिला किंवा स्मृतिचिन्ह दिलं की समजायचं इथं काहीतरी काळबेरं आहे, असे म्हणताच एकच हशा पिकला. यावेळी अजित पवारांनी अनेक विषयांवर वक्तव्य केली.
महत्वाच्या बातम्या;
शेतकरी आत्महत्या करतील या गडकरींच्या वक्तव्यावर राजू शेट्टी आक्रमक, म्हणाले व्वा गडकरी साहेब..
शेतकऱ्याचा नादच खुळा! डाळिंबाच्या संरक्षणासाठी अनोखी शक्कल, राज्यातच चर्चा...
White Jamun; इंदापूरच्या पांढऱ्या जांभळाची राज्यात चर्चा, किलोला 400 रुपयांचा दर
Published on: 27 April 2022, 02:11 IST