News

कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी राज्यात अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Updated on 09 April, 2022 9:20 AM IST

 कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी राज्यात अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या उसाचा कालावधी संपल्यामुळे उसाला तुरे फुटून वजनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. बरेच कारखाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु यावर्षी रेकॉर्डब्रेक ऊस लागवड झाल्यामुळे हा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. उसाचे टिपरु ही गाळप अभावी राहू देणार नाही. खाजगी तसेच सहकारी साखर कारखान्यांनी आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप केल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत. तसेच मंत्रिमंडळ बैठक घेऊन अतिरिक्त ऊस गाळपासाठी वाहतूक अनुदान आणि साखर उतारा तुट अनुदान देण्याचा निर्णय घेऊ, असे घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

नक्की वाचा:वाचा तुमचं गाव आहे का यादीत? चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर सोलापूर जिल्ह्यातील 59 गावांमधून जाणार, वाचा सविस्तर

केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील येडेश्वर साखर कारखान्याच्या आसवानी साठ केएलपीडी या विस्तारित प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते तर व्यासपीठावर पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, संजय दौंड तसेच संदीप शिरसागर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

 यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्न काही लोकांना केवळ राजकारण आणि भूल भुलैया  केलेला आहे. आम्ही या महामंडळाच्या पाठीशी उभे राहिलो व कारखान्यांकडून प्रत्येक टनामागे  दहा रुपये आणि सरकारचे दहा रुपये असे देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या महामंडळाला यातून दोनशे कोटी रुपये मिळतील. यामधून बीड व नगर तसेच जालन्यासह जिल्ह्यात संत भगवान बाबांच्या नावे कामगारांच्या मुलामुलींसाठी वस्तीगृह उभा असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.

नक्की वाचा:गव्हाला कधी इतका भाव ऐकला आहे का! गव्हाच्या या वाणाला मिळाला अविश्वसनीय भाव

बीड, लातूर जिल्ह्यात कृष्णा खोरेचे सात टीएमसी पाणी 2024 अखेर

मराठवाड्यात बरेच नवीन प्रकल्प होऊ शकतात तसेच पुढील महिन्यात वैतरणेचे 11 दशलक्ष घनमीटर पाणी मिळेल व मुकणे धरण बांधण्यात येणार आहे. मुंबईची गरज भागवून उरलेले पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवले जाणार आहे व गोदावरी खोऱ्याची तूट भरून काढली जाणार. तसेच पैनगंगा नदीचे चौरेचाळीस दशलक्ष घनमीटर पाणी परराज्यात वाहून जाते. ते पाणी नांदेड व हिंगोली जिल्ह्यात वळवले जाणार आहे. बीड व लातूर जिल्ह्याला कृष्णा खोऱ्यात सात टीएमसी पाणी आणण्याचे लक्ष असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.

English Summary: ajit pawar do some announcement about extra cane crop issue in kej
Published on: 09 April 2022, 09:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)