सध्या राज्यासह देशात कोळश्याचा तुटवडा (coal shortage) आहे. त्यामुळे भारनियमनाचे (load shedding) संकट आले आहे. यामुळे याचा त्रास सर्वाना होत आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही भारनियमन होऊ देणार नाही. मार्केटमधून वीज खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे. बाहेरून वीज खरेदी करू, पण राज्यात भारनियमन होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, वीज भारनियमन होणार नाही यासाठी सर्व खबरदारी घेत आहोत, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बैठकही पार पडली. यावेळी नितीन राऊतही उपस्थित होते. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने विजेचा शॉर्टेज निर्माण झाला आहे. देशभरात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे ही समस्या समोर आली आहे.
यामुळे कोळसा मिनिस्ट्रीलाही सांगण्यात आले आहे. कमी दिवसाचा कोळसा आहे. तो वाढवून द्या. मार्केटमध्ये जिथे वीज आहे ती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याबाबतची कॅबिनेटने परवानगी दिली आहे. भारनियमन होणार नाही याची खबरदारी घेतली आहे, याबाबत अजित पवार यांनी माहिती दिली. यामुळे यावर लवकर मार्ग निघेल असेही ते म्हणाले.
वीज संकटात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकांचे सध्या यामुळे हाल सुरु आहेत. सणासुदीच्या काळात हे संकट आल्याचे पंचाईत झाली आहे. तसेच गावाकडे सध्या यात्रा सुरु आहेत. यामुळे वीज जात असल्याने मोठा गोधळ निर्माण होत आहे.
पुढील काही दिवस तरी परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. 58 टक्के पेक्षा अधिक वीज गळती असलेल्या तसेच वीज बिलांची थकबाकी अधिक असलेल्या G1, G2 आणि G3 भागात, तसेच ज्या भागात विजेची चोरी होते त्या भागात चार ते पाच तासापर्यंतचे भारनियमन करण्यात येणार आहे. यामुळे आता उन्हाळ्यात याचा मोठा त्रास होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो शेतीसोबत करा 'हे' व्यवसाय, मिळेल लाखोंमध्ये नफा..
लोडशेडिंगबाबत ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा, कोणत्या भागात किती तासांचे भारनियमन, जाणून घ्या...
आता झोपो आंदोलन!! महावितरण विरोधात आता शेतकरी आक्रमक
Published on: 22 April 2022, 02:54 IST