स्व.वसंतराव नाईक साहेबांच्या 44 व्या पुण्यतिथी निमित्त वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठाण, पुसद यांच्या वतीने आयोजित कृषी गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यास कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले कृषी शास्त्रज्ञ, राज्यभरातील निवडक प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी बंधू - भगिनी आदींचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये कृषिशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर मोकाट, प्रयोगशील शेतकरी भगिनी सौ.सविताताई नालकर, श्री.अनिल किरणापुरे, श्री. रवींद्र गायकवाड, श्री. संदीप कांबळे, श्री. मिथिलेश देसाई, श्री. अनिल शेळके, श्री. बाळासाहेब पडुळ, श्री. महेंद्र परदेशी, श्री. विश्वास पाटील, श्री. बजरंग साळुंखे, श्री. कपिल जाचक या शेतकऱ्यांचा कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या सर्वांनीच आपले प्रयोग व तंत्रज्ञान याबद्दल आपापल्या भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. त्यांनी शेतीमध्ये बदल करून उत्पादनात वाढ केली आहे.
सरकारी नोकरी सोडून कोरफडीची शेती सुरु, आता कोटींमध्ये उलाढाल..
राज्य शासनाकडून प्रगतशील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण 2020 पासून प्रलंबित आहे. लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, असेही यावेळी बोलताना नमूद केले.
'साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा बाजारातील किमान बाजारभाव ३८ रूपये करा'
वसंतराव नाईक प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आज आयोजित कार्यक्रमासह कृषी क्षेत्रात आयोजित करण्यात येत असलेल्या विविध अभिनव उपक्रमांचेही यावेळी कौतुक केले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार, एकनाथ शिंदे यांचे घोषणा..
मोदी सरकार देणार सर्वसामान्य लोकांना आनंदाची बातमी! पेट्रोलचे दर होणार कमी, जाणून घ्या...
Published on: 19 August 2023, 10:37 IST