सध्याच्या काळात शेतीमध्ये अनेक बदल होत चालले आहेत. अनेक आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली जाते. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान विकसित करून कशी शेती करावी याची प्रात्यक्षिके दाखवली जातात.
आता दौंड शहरात 10 ते 15 जानेवारीदरम्यान जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अनेक गोष्टी दाखवल्या जाणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.
यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी कल्याणकारी योजनांची माहिती, महिला बचत गटाच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळणार आहे. तसेच प्रदर्शनात शेतीशी संबंधित, ऑटोमोबाईल कृषी यांत्रिकीकरण संबंधित, उत्पादक ते ग्राहक, नर्सरी, खाद्यसंस्कृती यासंदर्भातीलही स्टॉल उपलबध असतील.
द्राक्षांना मिळतोय विक्रमी दर, काळी द्राक्ष 130 तर साधी द्राक्ष 70 ते 80 किलो
याबाबत माहिती भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली. या प्रदर्शनात तालुका कृषी विभाग पंचायत समिती यांचा सहभाग असेल, त्यामुळे शासनाच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहचतील. दौंड तालुका कृषी उत्पादक व प्रकिया सहकारी संस्था प्रदर्शनाचे आयोजन करीत असून, प्रदर्शनाला दोन लाख शेतकरी नागरिक भेट देतील.
महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिकची कमाल! 751 किलोमीटरच्या रेंजसह अनेक फीचर्स..
तसेच या प्रदर्शनात उत्कृष्ट देशी बैल स्पर्धा, कृषिभूषण पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच विविध मान्यवरांचा सहभाग, त्यांचा शेतकरी बांधवांसोबत होणारा संवाद, हा सुवर्णकांचन योग यानिमित्ताने होत आहे.
यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घ्यावी, याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. असे वासुदेव काळे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या;
राज्यातील १२२ कारखान्यांनी एफआरपी थकविली, सरकार कारवाई करणार का?
काका पुतण्याचा वाद चव्हाट्यावर, काकानं पुतण्यावर रॉकेल टाकलं आणि टेंभा हाती घेऊन मारायला धावले! शेतीमुळे पेटला वाद.
जमिनीची सुपीकता कशी वाढवायची, जाणून घ्या संपूर्ण पद्धत
Published on: 09 January 2023, 01:35 IST