शेतकऱ्यांना शेती करणे दिवसेंदिवस जिकरीचे होत चालले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. आता यावर्षी बियाणांच्या दरवाढीमुळे शेतीच्या खर्चातही मोठी वाढ होणार आहे. बाजारात सर्टीफाईट आणि तृथफुल अशा दोन प्रकारचे बियाणे उपलब्ध होते. तसेच हे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल हा जास्त आहे.
यामध्ये कंपन्यांनी विकसित केलेले वाण तसेच विद्यापीठाने संशोधित केलेल्या वाणाचा समावेश असतो. यामुळे शेतकरी याची निवड करत असतात. असे असताना सोयाबीनच्या बियाण्यांमध्ये थैलीमागे ५०० ते १००० रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
तुरीच्या बियाण्यांचे दर स्थिर असले तरी कपाशीच्या बियाणांच्या दरातही प्रतिपाकिटमागे ४३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे याचा देखील फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. बियाणांच्या दरवाढीमुळे शेतीच्या खर्चातही मोठी वाढ होणार आहे. आधीच खतांचे दर, मजूर, यांचे दर देखील वाढले आहेत.
उसाला 75 रुपये मिळणार? अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
तसेच अनेक ठिकाणी बोगस बियाणे देखील विक्री केले जात आहे. यामुळे याचा देखील फटका अनेकांना दरवर्षी बसत आहे. यामुळे आता यावर कृषी विभागाची नजर आहे. तरी देखील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करतांना काळजी घ्यावी. दुसऱ्या राज्यातून देखील हे बियाणे महाराष्ट्रात विकले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
पाकिस्तानची उतरती कळा सुरू!! एकाच दिवशी पेट्रोलचे दर 30 रुपयांची वाढवले...
मित्रांनो गाडीची टाकी करा आजच फुल्ल! पेट्रोल पंपावर होणार खडखडाट...
उसाला 75 रुपये मिळणार? अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Published on: 27 May 2022, 06:05 IST