News

सालाबादप्रमाणे यंदाही बारामतीमध्ये आजपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित आहेत. असे असताना या प्रदर्शनात सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील देखील उपस्थित होते.

Updated on 19 January, 2023 5:55 PM IST

सालाबादप्रमाणे यंदाही बारामतीमध्ये आजपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित आहेत. असे असताना या प्रदर्शनात सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील देखील उपस्थित होते.

यामुळे त्यांचीच चर्चा बारामतीमध्ये सुरू होते. यावेळी त्यांनी राजेंद्र पवार आणि सर्वच पवार कुटूंबाचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, काय ते कृषी प्रदर्शन, काय ते सगळं नियोजन, काय ते राजेंद्रदादांच कृषी विषयाच ज्ञान, सगळं काही ओकेच..!!

यावेळी उपस्थित लोकांनी देखील टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली. त्यांनी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच अशी शेती आपण सांगोलात करणार असल्याचे सांगितले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

नोकरीला रामराम करत स्ट्रॉबेरीची लागवड! प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी देखील राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांचे कौतुक केले आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, बारामतीत भरलेलं कृषी प्रदर्शन (Baramati Agricultural Exhibition) पाहून मी भारावून गेलो, हे कृषी प्रदर्शन महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांनी येऊन पाहायला हवं, राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी अत्यंत उत्तम नियोजन केलं आहे.

शेतकऱ्यांनो कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज

इतक्या हाय टॅक्नॉलॉजीचे कृषी प्रदर्शन कुठेही होत नसल्याचे सत्तार म्हणाले. शेतीत नवीन काय प्रयोग करतो किंवा करायला पाहिजे या संदर्भातील माहिती इथे मिळते. राजेंद्र पवार यांनी बारामतीत शेतीत वेगवेगळे प्रकल्प राबवले आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. तसेच राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेलं योगदान कोणीही विसरणार नसल्याचे सत्तार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना हक्काचा पिकविमा मिळाच पाहिजे, शेतकरी संघटना आक्रमक..
इतक्या हाय टॅक्नॉलॉजीचे कृषी प्रदर्शन कुठेही होत नाही, प्रदर्शन पाहून भारावलो, कृषिमंत्र्यांकडून राजेंद्र पवार यांचे कौतुक
शेतकऱ्यांनो 31 मार्च पर्यंत वीजबिल भरा आणि 30 टक्के सूट मिळवा, शेतकऱ्यांसाठी मोठी संधी

English Summary: agricultural exhibition, planning, Rajendradada knowledge agriculture, everything ok
Published on: 19 January 2023, 05:50 IST