वर्धा : बऱ्याचदा काळजी घेऊन देखील शेतातील उत्पादनात घट होते. घट होण्यापाठीमागे बरीच कारणे असतात. सध्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा वापर चांगलाच महागात पडला आहे. बोगस बियाणे वापरल्यामुळे बऱ्याच नुकसानीला शेतकरी सामोरे जात आहेत. बोगस बियाणांमुळे त्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने देखील बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जारी केल्या.
दरम्यान एक जून पूर्वी कापूस उत्पादक शेतकर्यांना कापसाच्या बियाणांची विक्री करू नये, असे राज्य सरकारने परिपत्रक काढले होते. मात्र तरीही अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आले. आणि त्यामुळेच आता कृषी विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईचा श्रीगणेशा वर्धा जिल्ह्यातून सुरु करण्यात आला आहे.
नियमांचे उल्लंघन करुन कापूस बियाणांची विक्री करणे तसेच बियाणे कंपनीने कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
खत-बियाणांबाबत अनियमितता
कृषी विभागाने 9 भरारी पथकांची नेमणूक केली आहे. खरीब हंगाम सुरु होण्यापूर्वीच जिल्ह्यातील खत-बियाणांबाबत अनियमितता आढळून आल्यामुळे या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारची अनियमितता वाढू नये यासाठी कृषी विभागाकडून काळजी घेतली जात आहे.
हंगाम सुरु होण्यापूर्वीच खताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी अफवा पसरवली जात आहे तसेच तुटवडा निर्माण झाल्यास खतांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकेल असे चित्र निर्माण केले जात आहे. या प्रक्रियेवर निर्बंध घालण्यासाठी भरारी पथक तैनात करण्यात आले आहे.
खत, बियाणे खरेदी करताना घ्या या गोष्टींची काळजी
खत, बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची बरीच फसवणूक केली जाते. शेतकऱ्यांनी ही फसवणूक टाळण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेच आहे. खत, बियाणे खरेदी केल्यावर त्याची रीतसर आणि पक्की पावतीच घ्यावी. शिवाय त्या पावतीवर कृषी सेवा केंद्राचा नोंदणी क्रमांक आहे का हे देखील पहावे. तसेच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का याची देखील पडताळणी करावी. छापील पावतीच घेणे अनिवार्य आहे. जे शेतकरी बंधू बियाणे किंवा खते उधारीवर घेतात त्यांनाच सेवा चालक साधे बील देतात.
बारामतीच्या शेतकऱ्यांचा नादच खुळा; पवार साहेबांनी थोपटली पाठ, म्हणाले...
भरारी पथक सज्ज
कृषी विभागाकडून यंदा खरीप हंगामात खत आणि बियाणे विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा तसेच अनियमितता होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. तालुकानिहाय एक व जिल्हास्तरावर एक अशी 9 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. याआधी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी
दोन ठिकाणी कारवाई करुन बियाणे विक्रीस बंदी घातली होती. फक्त तालुकास्तरावर नाही तर गाव स्तरावर असलेल्या कृषी केंद्रावरही ही भरारी पथकं लक्ष ठेवून आहेत.
अनियमितता आढळल्यास कुठे कराल तक्रार
खत आणि बियाणे विक्रीमध्ये अनियमितता आढळून आल्यास शेतकऱ्यांनी थेट कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केले आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वीच जिल्ह्यात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली असल्यामुळे आता काही प्रमाणात का होईना अशा प्रकारांवर बंदी येईल.
महत्वाच्या बातम्या:
पीक कर्जाबाबत ठाकरे सरकारची मोठी घोषणा; बँकांना दिले 'हे' आदेश
"प्रसंगी रक्त सांडू पण हक्काचा एक थेंबही देणार नाही"
Published on: 31 May 2022, 11:42 IST