News

औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अधिकाऱ्याला तुम्ही दारू पिता का? असा प्रश्न केला होता. या विधानामुळे अब्दुल सत्तार यांच्यावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

Updated on 31 October, 2022 4:22 PM IST

औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अधिकाऱ्याला तुम्ही दारू पिता का? असा प्रश्न केला होता. या विधानामुळे अब्दुल सत्तार यांच्यावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

विरोधकांनीही या प्रकरणी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं सत्तारांनी राजीनामा द्यावा, तर बुधवार पर्यंत माझ्या राजीनाम्याची ब्रेकिंग न्यूज येऊ शकते, असं मोठं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

मोठी बातमी: शरद पवारांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. सत्तार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला राजीनामा देण्याची परवानगी दिली तर बुधवारी तुमच्याकडे सत्तार यांनी राजीनामा दिल्याची ब्रेकिंग न्यूज येऊ शकते. सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर कोण गदा घेऊन येतं आणि त्याचा मुकाबला आमची ढाल तलवार कशी करते हे तुम्हाला दिसेल.

भाजीपाला महागला; शेवगा 200 रुपये किलो, जाणून घ्या इतर भाज्यांचे दर

चंद्रकांत खैरे यांनी माझ्या विरोधात येऊन लढावं. त्यांच्यासाठी सिल्लोडचं मैदान खाली आहे. चंद्रकांत खैरे यांनी हातात घेतलेल्या गदेसाठी हनुमानाची ताकद लागते. ती ताकद खैरे यांच्याकडे नाहीय ते माझ्याशी काय लढणार? असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केला.

पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनाच मागितले पैसे, व्हिडिओ वायरल

English Summary: Agitation by the statement of the Minister of Agriculture
Published on: 31 October 2022, 04:20 IST