मोदी सरकारने कांद्यावर लागू केलेल्या ४० टक्के निर्यात शुल्काच्या निर्णयानंतर साधारण तीनशे ते चारशे रुपयांनी दर घसरले आहे. आवकेतही पन्नास टक्के घसरण झाली. अहमदनगर जिल्ह्यात पारनेर येथील बाजार समितीत बुधवारी सर्वाधिक आवक असलेल्या नगर, घोडेगाव, राहुरी बाजार समितीत सोमवारी लिलाव झाले.
सात आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कांद्याला गेल्या पंधरा दिवसांपासून दर वाढू लागले असताना केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के कर लावल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे शेतकरी आंदोलन करत आहेत.
निर्यातकर लागू केल्यानंतर झालेल्या लिलावात नगर जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा दरावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले निर्यातकर वाढीच्या निर्णयाआधी २०० रुपयांपासून जास्तीत जास्त २८०० रुपयांपर्यंत, तर सरासरी १४०० ते १६०० रुपये दर होते.
दुधाचे एटीएम: या मशीनच्या मदतीने शेतकऱ्याचा मुलगा लाखोंची कमाई करतोय, जाणून घ्या..
असे असताना निर्णयानंतर २०० रुपयांपासून जास्तीत जास्त २ हजार ते २२०० रुपयांपर्यंत व सरासरी १३०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे पाहायला मिळाले. कोपरगाव बाजार समितीत दररोज लिलाव होतात. मात्र दोन दिवसांपासून आवक आली नाही.
इतर बाजार समित्यातही ५० टक्के आवक कमी झाली आहे. शनिवारी निर्यात शुल्क वाढीचा निर्णय लागू झाल्यानंतर हा दर २५०० रुपयांवर आला. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
शेतकऱ्यांनो डांगी गाय देते 800 लिटर दूध, जाणून घ्या कसे ओळखावे
आवकेतही मोठी घट झाली. श्रीरामपूरला आज झालेल्या लिलावात साठ टक्के आवक कमी झाली. २३०० रुपयांपर्यंत जास्तीत जास्त दर होता. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अखेर तीन दिवसानंतर नाशिकमध्ये पुन्हा कांद्याचे लिलाव सुरु, केंद्रीय मंत्र्याच्या मध्यस्थीनंतर निर्णय
आता खताच्या पिशवीवर पंतप्रधान मोदींचा फोटो, खास संदेश लिहिला जाणार, सेंद्रिय शेतीवर सरकारचा भर
Published on: 24 August 2023, 02:45 IST