गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेवर मोठे आर्थिक संकट आले आहे. देशात मोठी महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. यामुळे रोड रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. श्रीलंकेत पेट्रोल (Petrol), डिझेलच्या किमतीने 400 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. असे असताना आता अजून एका देशाची परिस्थिती कशीही अशीच झाली आहे.
भारताचा शेजारी देश असलेल्या भूतानमध्ये देखील अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे देशावर आर्थिक संकट आले आहे. भूतानच्या ग्रामीण भागातील लोकांना अन्नधान्याच्या खरेदीसाठी रांगा लवण्याची वेळ आली आहे. यामुळे हा देश देखील कर्जाच्या खाईत गेला आहे.
याबाबत भूतानचे वित्तमंत्री लोकनाथ शर्मा यांनी माहिती दिली. भूतान हा एक छोटा देश आहे, त्याची लोकसंख्या 8 लाखांपेक्षाही कमी आहे. या देशाला सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
आता कोल्हापूर सांगलीत पूर येणार नाही, अलमट्टी धरणाबाबत झाली महत्वपूर्ण बैठक
रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तसेच खाद्य तेल आणि इतर गोष्टींचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे महागाई वाढली आहे. यातच कोरोनामुळे देशात आर्थिक परिस्थिती ओढावली आहे. देशात वाढत असलेल्या महागाईमुळे भूतानच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढला आहे.
तसेच भूतान हा अनेक गोष्टींसाठी भारतावर अवलंबून आहे. भूतानने गेल्या वर्षी भारताकडून 30 मिलियन डॉलचे धान्य खरेदी केले होते. भारताकडून भूतान गहू आणि तांदूळाची खरेदी करतो. तसेच सध्या भारताने गहू आणि साखरेच्या निर्यातीवर प्रतिबंध घातले आहेत. यामुळे भूतानच्या अडचणीत वाढ झाली आहे.
उसाला 75 रुपये मिळणार? अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
त्यामुळे देशात अन्नधान्याचा तुटवडा जाणवू शकतो, याची भूतान सरकारला काळजी वाटत आहे. मात्र दुसरीकडे शेजारील देशांना धान्याची निर्यात सुरूच ठेवणार असल्याचे भारताने म्हटले आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
यावर्षीही शेती परवडणार की नाही? बियाणांच्या दरात मोठी वाढ, सोयाबीन बॅग मागे 1 हजाराची वाढ
पाकिस्तानची उतरती कळा सुरू!! एकाच दिवशी पेट्रोलचे दर 30 रुपयांची वाढवले...
मित्रांनो गाडीची टाकी करा आजच फुल्ल! पेट्रोल पंपावर होणार खडखडाट...
Published on: 28 May 2022, 11:13 IST