Delhi : इतर क्षेत्राप्रमाणे शेती व्यवसायात देखील नवनवीन प्रयोग करणे चालूच आहे. शेतकरी बंधू देखील पिकांवर नवनवीन प्रयोग करत असतात. तसेच कृषी शास्रज्ञदेखील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बरेच नवीन प्रयोग,तंत्रज्ञान विकसित करत असतात. नुकतंच एरोपोनिक बटाटा बियाणे याच्या उत्पादनाचे अनोखे 'एरोपोनिक तंत्र' विकसित झालेले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्था यांनी हवाई बटाटा बियाणे उत्पादनाचे हे अनोखे तंत्र विकसित केले आहे.
विषाणूमुक्त बटाटा बियाणांच्या उत्पादनासाठी मध्य प्रदेश सरकार तसेच भारतीय कृषी संशोधन परिषद यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या उपस्थितीत याबद्दल करार करण्यात आला आहे. तसेच बुधवारी मध्य प्रदेशचे, फलोत्पादन, अन्न प्रक्रिया राज्यमंत्री श्री भरतसिंह कुशवाह यांनी दिल्लीत स्वाक्षरी केली. या करारानुसार ग्वाल्हेरमधील एरोपोनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेली प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. असे झाल्यास ही राज्याची पहिली एरोपोनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशाळा असेल.
केंद्रीय बटाटा संशोधन संस्था, शिमला येथील शास्त्रज्ञांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. विषाणूमुक्त बियाणे बटाटे उत्पादनाच्या एरोपोनिक पद्धतीद्वारे मध्य प्रदेशच्या उद्यान विभागाला या तंत्रज्ञानाला परवाना देण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकरी बंधूना फायदा होणार आहे.
या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बटाटा बियाणांची गरज भागणार आहे. परिणामी राज्यात तसेच देशात बटाट्याचे उत्पादन वाढेल. बटाटा हे जगातील सर्वात महत्वाचे अन्नधान्य असलेले पीक असून ज्याची जागतिक अन्न व्यवस्थेत महत्वाची भूमिका आहे. आयसीएआरच्या संस्था आपापल्या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहेत.
एरोपोनिक तंत्रज्ञानामुळे बटाटा बियाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भागेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावेल. बटाट्याच्या उत्पादनात मध्य प्रदेश हे सहाव्या क्रमांकावर असून राज्यातील माळवा प्रदेश हा बटाटा उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मध्य प्रदेश हे बटाटा प्रक्रियेसाठी एक आदर्श राज्य म्हणून नावाजले आहे. राज्यातील प्रमुख बटाटा उत्पादक क्षेत्रामध्ये इंदूर, ग्वाल्हेर, उज्जैन, देवास, शाजापूर, भोपाळ तसेच राज्यातील छिंदवाडा, सिधी, सतना, रेवा, राजगढ, सागर, दमोह, छिंदवाडा, जबलपूर, पन्ना, मुरैना, छतरपूर, विदिशा, रतलाम आणि बैतूल यांचा समावेश आहे.
राज्यात उच्च दर्जाच्या बियाणांचा असणारा तुटवडा ही समस्या आता सोडवली जात आहे. असे मध्य प्रदेशचे अन्न प्रक्रिया राज्यमंत्री कुशवाह यांनी सांगितले. मध्य प्रदेशचे फलोत्पादन आयुक्त ई. रमेश कुमार म्हणाले की, मध्यप्रदेशला सुमारे 4 लाख टन बियाणांची गरज आहे आणि जे 10 लाख मिनी कंद तयार करण्यासाठी आवश्यक आहे. ही क्षमता या तंत्रज्ञानामुळे शक्य होईल. ग्वाल्हेरमध्ये 'एक जिल्हा - एक उत्पादन' अंतर्गत बटाटा पिकाची निवड करण्यात आली आहे.
आयसीएआरचे डीजी डॉ. त्रिलोचन महापात्रा, डीडीजी-फॉर्टिकल्चर डॉ. आनंद कुमार सिंग, मध्य प्रदेशचे अतिरिक्त संचालक फलोत्पादन डॉ. के.एस. किराड, केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेचे प्रभारी संचालक डॉ.एन.के. पांडे अॅग्रीनोवेट इंडियाच्या सीईओ डॉ.सुधा म्हैसूर यांनीही एरोपोनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली आहे. या माहितीतून असे समोर आले आहे की, या तंत्रात पोषकद्रव्ये मिस्टिंगच्या स्वरूपात मुळांमध्ये फवारली जातात. वनस्पतीचा वरचा भाग खुल्या हवेत आणि प्रकाशात राहतो. एका रोपातून सरासरी 35-60 मिनीकँड्स मिळतात. विशेष म्हणजे मातीचा वापर होत नसल्याने मातीचे रोग होत नाहीत.
महत्वाच्या बातम्या:
तंत्र वापरा परंतु माहिती घेऊन! वडाच्या झाडाखालील माती आणि हरभरा डाळीच्या पिठाचे जीवामृतमधील महत्व
शेवगा लागवड एक उत्तम पर्याय! योग्य व्यवस्थापन करा अन 6 ते 7 महिन्यात कमवा बक्कळ नफ
Published on: 06 May 2022, 10:09 IST