News

सध्या शेतकरी अधिक उत्पादन घेण्याकडे लक्ष देत आहेत. खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना खताची गरज भासते. मात्र भेसळयुक्त खते बाजारात विकली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा कृषी विभागाच्या पथकाने दिला आहे.

Updated on 25 July, 2022 6:59 PM IST

सध्या शेतकरी अधिक उत्पादन घेण्याकडे लक्ष देत आहेत. खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना खताची गरज भासते. मात्र भेसळयुक्त खते (Adulterated fertilizers) बाजारात विकली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा कृषी विभागाच्या (Department of Agriculture) पथकाने दिला आहे.

खत (fertilizers) उद्योगातील प्रसिद्ध ब्रँड असलेले खत १२ : ६१ : ० आहे. या विद्राव्य खतामध्ये चक्क मिठाची भेसळ केल्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. सोलापुरात खतामध्ये मिठाची भेसळ असल्याचे लक्षात आले आहे.

कृषी विभागाच्या पथकाने या खताच्या बॅगा आणि त्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसेच पोलिसांकडे फिर्यादीही दाखल केल्या आहेत. पण एकूण सर्व प्रकार पाहता खताच्या या भेसळीत टोळी कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील आठवड्यात एका शेतकऱ्याने पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला फोन करून त्यासंबंधीची तक्रार दिली होती. मोहोळ येथे बनावट १२ : ६१ : ० या विद्राव्य खताची विक्री होत असून, तक्रारदाराने स्वतः दोन बॅग खरेदी केल्याचेही सांगितले आहे.

हे ही वाचा 
business Earning: काय सांगता? 'या' व्यवसायातून होतेय महिना 5 लाखांपर्यंत कमाई; एकदा पहाच..

संशयितांवर गुन्हा दाखल

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी अशोक पवार यांनी पुण्यातून येऊन पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. त्यासंबंधी रीतसर फिर्यादही दिली. त्यानंतर वैभव काळे (रा. मोहोळ) व राहुल शेंडगे (रा. ढोकबाभुळगाव, ता. मोहोळ) या संशयितांवर गुन्हा दाखल करून चौकशीसाठी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

हे ही वाचा
भारीच की! 'या' तंत्रज्ञानाचा वापर करून वाढवा भाजीपाला; कमी वेळेत मिळणार दुप्पट उत्पन्न

मोहोळ येथील प्रकरणात वैभव काळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली, तेव्हा मोहोळमध्ये नाईकवाडी वस्ती येथे पत्रा शेडमध्ये बनावट खत तयार करून त्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले.

तिथे मिठाच्या काही गोण्याही आढळल्या. त्याच्याकडे त्याबाबत विचारणा केली असता, हे मीठच आपण एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या पोत्यात भरून विक्री करत असल्याचे त्याने सांगितले असे तंत्र अधिकारी अशोक पवार यांनी माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या 
Cultivation of jojoba! जोजोबा शेतीतून शेतकरी होणार मालामाल; जाणून घेऊया हे पीक कसे पिकवणार..
Benefit of Cultivation: शेतकऱ्यांनो 'ही' शेती करणार तुमच्या आयुष्याची दिवाळी, जाणून घ्या शेतीबद्दल..
Crop cultivation! फायदेशीर लागवड; शेतकऱ्यांनो पावसाळ्यात 'या' पिकाची शेती करा व्हाल लखपती

English Summary: adulteration salt fertilizer thieves pay sin
Published on: 25 July 2022, 05:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)