राज्यात काही अनेक बचत गट आहेत. की त्यांनी मोठा नावलौकिक कमावला आहे. यामध्ये पुरंदर, जि. पुणे येथील वाघेश्वरी महिला दूध उत्पादक कृषी बचत गटातील २५ महिलांनी सामूहिक गोठा उभारला आहे.
दूध उत्पादनावर न थांबता प्रक्रिया आणि ब्रॅण्डिंगद्वारे या गटाने पुण्यातील बाजारपेठेत चांगल्या प्रकारे वाटचाल सुरू केली आहे. यामुळे शेतीला पूरक उद्योगाची चांगली जोड मिळाली आहे. यामुळे त्यांना चार पैसे मिळू लागले आहेत.
पिंगोरी हे डोंगरांनी वेढलेले गाव. गेल्या काही वर्षांमध्ये गावात विविध सामाजिक संस्था, उद्योगांचा सामाजिक दायित्व निधी आणि जलयुक्त शिवार योजनेद्वारे शाश्वत सिंचनाची सोय झाली.
मोठी बातमी! चिंदरमध्ये विषबाधेने ४१ जनावरांचा मृत्यू...
शेतकऱ्यांनी एकत्र येत पिंगोरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादन आणि विक्री व्यवसाय सुरू केला. यावेळी सामूहिक गोठा करण्याचा विचार बाबा शिंदे यांनी मांडला.
सर्वांनी एकाच ठिकाणी गोठ्याबरोबर चारा, पाणी, पशुखाद्य व्यवस्थापन, दूध संकलन आणि प्रक्रिया केली तर ते अधिक फायदेशीर ठरेल असा विचार पुढे आला. या संकल्पनेला मान्यता देत बचत गटाच्या २५ महिलांसाठी २५ संकरित जर्सी दुधाळ गायी सामूहिक गोठा बांधण्यासाठी सीएसआर फंडामधून सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.
गुणवत्तेमुळे शंभर रोपवाटिकांची मान्यता रद्द, शेतकऱ्यांना फसवणे आले अंगलट...
महिला बचत गटाने २० गुंठे जागा भाडेतत्त्वावर घेऊन, या ठिकाणी पशुपालन आणि दूध प्रक्रिया प्रकल्प उभारला. गोठ्याचे लोकार्पण रोटरी क्लब ऑफ औंधचे मावळते अध्यक्ष सुखानंद जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कृषिमंत्री होताच धनंजय मुंडे यांचा कामांचा धडाका! शेतकऱ्यांसाठी घेतले अनेक निर्णय..
टोमॅटोचे भाव पडले त्यावेळी कुठं गेले होते आता ओरडणारे...?
पशुधन खरेदीसाठी बँका देतात फक्त ४ टक्के व्याजाने कर्ज, असा करा अर्ज...
Published on: 17 July 2023, 01:36 IST