News

उस्मानाबाद जिल्ह्यातील (Excess sugarcane) अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील (Sugar Factory) साखर कारखान्यांची मदत घेतली जाणार आहे. याकरिता गावनिहाय शिल्लक ऊसाचे क्षेत्र तसेच ऊसतोडीचे नियोजन केले जाणार आहे.

Updated on 19 March, 2022 12:50 PM IST

राज्यातील शेतकऱ्यांच्या पुढे सध्या दोन महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. एक म्हणजे शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, आणि दुसरा प्रश्न म्हणजे सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. असे असताना मराठवाड्यातील शेतकरी सध्या आपला ऊस कसा तोडला जाईल याचा विचार करत आहेत. यावर आता एक मोठा घेण्यात आला आहे.

सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील (Excess sugarcane) अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील (Sugar Factory) साखर कारखान्यांची मदत घेतली जाणार आहे. याकरिता गावनिहाय शिल्लक ऊसाचे क्षेत्र तसेच ऊसतोडीचे नियोजन केले जाणार आहे. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता एवढा एकच पर्याय आहे. यामुळे अनेक दिवसांपासून शेतकरी याबाबत मागणी करत आहेत. अखेर यावर निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत प्रस्ताव साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना देण्यात येणार आहे. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊसतोडीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी कळंब तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या प्रयत्नामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याची तोड उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाली होती. त्यामुळे एका गावाचा प्रश्न मार्गी लागला होता. यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता.

यावेळी त्यांचे ढोल-ताशाच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आले होते. आता संबंध (Osmanabad District) उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील (Sugar Factory) साखर कारखान्यांची मदत घेतली जाणार आहे. यामुळे आता याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अनेकांच्या उसाला सध्या तुरे आले आहेत. यामुळे वजनात मोठी घट होणार आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

सध्या पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच मराठवाड्यातही ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. यंदा योग्य नियोजन न झाल्यामुळे मार्च अखेरच्या टप्प्यात असताना अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रात उसाचे गाळप उरकत आले आहे. यामुळे आता येथील यंत्रणेची मदत घेण्याची मागणी अनेक शेतकरी करत आहेत. यामुळे मराठवाड्यातही राहिलेल्या उसाचे गाळप होण्यास मदत होणार आहे. याठिकाणी अजून २० टक्के ऊस फडातच आहे.

महत्वाच्या बातम्या;
घोषणा फक्त विधानसभेत, शिवारात मात्र विजतोडणी सुरूच, सरकारच्या मानत नेमकं आहे तरी काय?
आंबा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी!! पणन मंडळाच्या बैठकीत झाला मोठा निर्णय..
चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला समोर दिसला बिबट्या आणि.., थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण..

 

English Summary: additional sugarcane of Marathwada eradicated Western Maharashtra, decision was taken meeting ..
Published on: 19 March 2022, 12:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)