सध्या राज्यात अनेक ठिकाणी रोडची कामे सुरू आहेत. तसेच मोठे महामार्ग बांधले जात आहेत. यामध्ये सुरुवातीलाच शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम दिली जाते. मात्र सातारा- लातूर या महामार्गावर काहीसे वेगळे घडले आहे.
हा महामार्ग रस्ते विकास महामंडळाने गेल्या तीन वर्षात तयार केला आहे. सातारा, कोरेगाव, खटाव व माण या तालुक्यातून हा रस्ता जातो. मात्र, अनेक ठिकाणी भूसंपादन न करताच हा रस्ता करण्यात आला. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे भूसंपादन कधी होणार, त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. यामध्ये अनेक लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. यामुळे शेतकरी नाराज आहेत.
ब्रेकिंग! ऊस दर आंदोलन पेटले, शेतकरी संघटनेने थांबवली वाहतूक
भूसंपादन करून शेतकरी वर्गाला याची कल्पना ही देण्यात आली नाही. काही लोकांनी आवाज उठवला असता. दुसऱ्यावेळी निवेदा काढून भूसंपादन करण्यात आले, तर काही ठिकाणी नागरिकांना या वरती कोर्टात धाव घेतली असल्याचे शेतकरी सांगतात.
याबाबत सर्वसामान्य लोकांना याची पुसटशी ही कल्पना देण्यात आली नाही. ठेकेदार यांनी दंडिलशाहीने रस्ता करून घेतला. आता मात्र शेतकरी आक्रमक झाले आहेत. सरकार आणि लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२४५० रुपये FRP बसत असताना २५०० रुपये भाव देण्याचे जाहिर केल्यानुसार कारखाना लवकरच उर्वरित दर देणार
दरम्यान, सातारा जिल्ह्याला वेगवान करण्यासाठी अनेक राष्ट्रीय महामार्ग झाले. पुणे- बेंगलोर या 4 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला तर आशियाई महामार्ग 47 म्हणून मान्यता देखील मिळाली. यामुळे या भागाचा विकास होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकरी आता पीक नुकसानीचा स्वताच पंचनामा करणार, कोणीही राहणार नाही मदतीपासून वंचीत
मेहंदी शेतीतून करोडोंची कमाई, प्रत्येक ऋतूमध्ये मागणी असणारे एकमेव पीक
लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीस परवानगी मिळणार? बैलगाडा चालकांची मागणी
Published on: 28 September 2022, 02:51 IST