नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी अल्पभूधारक शेतकरी व त्यांचा वेळ वाचवा यासाठी एक रोबोट तयार केला आहे. पिकांवर रसायने फवारणी, गवत काढणे तसेच क्रेट वाहून नेहने सर्व कामे रोबोट करत आहे असे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. काळाच्या बदलानुसार शेतकऱ्यांसाठी रोबोट तसेच ड्रोन इत्यादी उपकरणे तयार केलेली आहेत. जे की नाशिक मधील चांदवड येथील इंजिनिअरिंग कॉलेज मधील नामदेव पवार, अमोल ठाकरे, अमित कोतवाल तसेच जगदीश गांगुर्डे या विद्यार्थ्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन रोबोट तयार केला आहे.
संशोधनाची दिशा :-
ननामदेव पवार हा विद्यार्थ्याने यावर्षी बीई ची पदवी घेतली आहे जे की तो मध्य प्रदेशात एका कंपनीमध्ये काम करत आहे. नामदेव ने सांगितले की लास्ट इयर ला असताना आम्ही रोबोट तयार करण्यावर काम चालू केले. जे की रसायने फवारायची म्हणली तर अंगावर त्याचे ओझे तर कधी कधी रसायने अंगावर पडण्याची सुद्धा भीती असते. अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणे शक्य नसते कारण ते खूप महाग असतात. आम्ही तयार केला असलेला रोबोट हा बॅटरीवर चालणारा असून इंधन बचत करतो तसेच प्रदूषण देखील कमी होते. आम्ही अनेक बागायतदार लोकांसोबत संवाद साधून याची निर्मिती केली आहे.
हेही वाचा:-पोटावरील वाढलेली चरबी लगेच कमी करायची असेल तर डिनरमध्ये खा हे पदार्थ, मग बघा कमाल!
संशोधनात योगदान :-
रोबोट तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे द्राक्षे व डाळिंब उत्पादकांकडून कौतुक झाले जे की या चार विद्यार्थ्यांची नवे नामदेव पवार जगदीश गांगुर्डे, अमित कोतवाल अमोल ठाकरे अशी आहेत. प्राध्यापक एस. पी. इंगळे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा:-अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय, जिवाणू खते महत्त्वाची...
रोबोटची वैशिष्ट्य :-
रोबोट तयार करण्यासाठी १२ व्होल्ट च्या दोन बॅटरी वापरण्यात आल्या तसेच रोबोट ची रिमोट एजन्सी रेंज हे ५०० मीटर आहे. एकदा चार्ज केला की अर्धा तास रोबोट सज्ज राहत आहे. तसेच १०-१२ गुंठे क्षेत्रावर फवारणी करणे सशक्य झाले आहे. द्रावण ठेवण्यासाठी जवळपास ६० लिटर टाकीचा वापर करण्यात आलेला आहे. रोबोट तयार करण्यासाठी जळपास ४० हजार रुपये खर्च झालेला आहे. जे की रोबोट चा रिमोट सुद्धा तयार करण्यात आले आहे. अगदी अल्पभूधारक शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांनी हा रोबोट तयार केलेला आहे.
Published on: 08 September 2022, 05:34 IST