News

Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचे सत्र सुरूच आहे. सध्या पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मध्यंतरी उघडीप दिल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Updated on 26 September, 2022 1:38 PM IST

Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. सध्या पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मध्यंतरी उघडीप दिल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) पावसामुळे कापूस पिकाचे (Cotton Crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काही दिवसांपूर्वी अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना (farmers) मोठा फटका सहन करावा लागला होता. या पावसाचा शेती पिकांवर परिणाम झाला आहे. धुळे जिल्ह्यातील (Dhule district) कापूस उत्पादक (Cotton Growers) शेतकऱ्यांचेही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे कापूस पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोबतच शोषक किडींचा प्रादुर्भावही वाढला असून शेतात पाणी साचल्याने पीक खराब होत आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट होईल, असा अंदाज असल्याने पिकांवर किडीचा वाढता प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

शेतकऱ्यांनी आता लवकर पंचनामा करून शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या पावसात कपाशीसह सोयाबीनचे पीकही किडींच्या हल्ल्याने उद्ध्वस्त होत असल्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रतीक्षा संपणार! केंद्रीय कर्मचाऱ्यांना या दिवशी मिळणार गोड बातमी; होणार मोठा फायदा

पावसामुळे 30 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात यंदा मुसळधार पाऊस झाल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसामुळे कापूस पिकांना अधिक फटका बसला असून प्राथमिक अंदाजानुसार या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

गतवर्षी जिल्ह्यात 1 लाख 7 हजार 109 हेक्‍टरवर कापसाची पेरणी झाली होती, त्यापैकी 77 हजार 295 हेक्‍टरवर कापसाचे उत्पादन झाले होते. यंदा 1 लाख 747 हेक्‍टरवर पेरणी झाली असून, त्यापैकी 84 हजार 961 हेक्‍टरवर कपाशीची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस लागवड क्षेत्रात अकरा हजार हेक्टरने वाढ झाली आहे.

नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्याने केली

अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावही वाढू लागला आहे.त्याबरोबरच भात शोषणाऱ्या अळीचा हल्लाही वाढला असून एकीकडे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. दुसरीकडे उत्पादनात घट होऊ शकते, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

जून महिन्यापासून शेतकऱ्यांनी शेतीवर मोठा खर्च केला आहे. फवारणी, खुरपणी, खते देऊन पिके वाढवली. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पेट्रोल डिझेलच्या नवीन किमती जाहीर! पेट्रोल फक्त 84 रुपयांना...

पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

राज्यात अतिवृष्टीमुळे 27 लाख शेतकरी संकटात सापडले आहेत. जून महिन्यातील अतिवृष्टीनंतर राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाला. तसेच या चालू सप्टेंबर महिन्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. याचा मोठा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर झाला आहे. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासोबतच अनेक ठिकाणी शेतजमिनीचीही धूप झाली आहे.

राज्यात या अतिवृष्टीमुळे 27 लाख शेतकरी बाधित झाल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली असून काही ठिकाणी पशुधनाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

महत्वाच्या बातम्या:
राज्यात ढगाळ वातावरण! या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; यलो अलर्ट जारी
कांद्याचा भाव वाढणार! शेतकऱ्यांनो व्हा सज्ज; नाफेडने साठवलेला 50 टक्के कांदा खराब

English Summary: A major blow to cotton crop; Farmers' demand for compensation from government
Published on: 26 September 2022, 01:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)