राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या अनेक अडचणीचा सामना करत आहे. यातच अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. सध्या राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे. राज्यातील साखर कारखाने सुरु आहेत मात्र ऊस तोडणीचे काम अद्यापही संपले नाही. पंढरपूर तालुक्यात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
असे असे असताना सत्ताधारी चेअरमन भगीरथ भालके यांच्या गटाने निवडणुकीच्या निमित्ताने विचारविनिमय करण्यासाठी आज बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये एका शेतकऱ्याने ऊसाचे बिल मागितले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. उसाच्या बिलाचा प्रश्न उपस्थित करताच व्यासपीठावरील कार्यकर्ते शेतकऱ्याच्या अंगावर धावून गेले आणि धक्काबुक्की केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, निवडणुकीच्या संदर्भात विचार करण्यासाठी पंढरपुरातील रात्री दाते मंगल कार्यालयात श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे आणि विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद यांची बैठक आयोजित केली होती. रोपळे येथे राहणारे शेतकरी जगन भोसले यांनी उसाच्या बिलाची मागणी केली होती.
घर बांधायचे असेल तर करा घाई! लोखंड झालंय खूपच स्वस्त...
शेतकरी जगन भोसले यांनी माईक वर येऊन, अनेक वेळा चेअरमन भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्याकडे उसाच्या बिलाची मागणी केली मात्र अजूनही मला उसाचे बिल मिळाले नाही. शिवाय या विषयावर कोणीच बोलायला तयार नसल्याची व्यथा या शेतकऱ्याने सर्वांसमोर मांडली. त्यामुळे चिडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी जगन भोसले यांना व्यासपीठावर जाऊन धक्काबुक्की केली.
महत्वाच्या बातम्या;
पुणतांब्यानंतर शेतकरी आंदोलन राज्यभर पसरले, आता क्रांती होणारच...
शर्यतीसाठी लांडगे यांनी मला हा खास ड्रेस शिवून दिल्याबद्दल दादा तुमचे आभार
मोदी सरकारची 10 लाखांची घोषणा! आता मिळणार हमीशिवाय 10 लाखांचे कर्ज, असा करा अर्ज...
Published on: 03 June 2022, 05:11 IST