मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक प्रेरणादायी यशोगाथा घेऊन आलो आहोत. आपल्याला हे माहीतच आहे की, भारताची अर्थव्यवस्था आणि बहुसंख्य लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. जर आपण शेतीक्षेत्राचा विचार केला तर शेतीत पिकणाऱ्या बऱ्याच मालावर प्रक्रिया करून बाजारपेठेत योग्य नियोजन करून विकला तर एक चांगला यशस्वी उद्योग उभा राहू शकतो.
टोमॅटोवर प्रक्रिया करणारे उद्योग असतील किंवा बटाटा प्रक्रिया उद्योग असतील याच्या माध्यमातूनही शेतकरी चांगला नफा कमावू शकतात. मात्र या सगळ्या उद्योगांमध्ये लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती करण्याचा उद्योग हा तर एक सोनेरी संधी सारखा उद्योग आहे. योग्य माहिती आणि पूर्वनियोजन करून जर हा उद्योग सुरु केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी उद्योग उभारू शकाल. आणि आजच्या या भागातून लाकडी घाण्यावरील तेलनिर्मीती उद्योगाची माहिती आणि यशोगाथा तुम्हाला जाणून घेता येणार आहे.
लाकडी घाण्यावरील तेलनिर्मीती उद्योग :
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील माखणी येथील प्रयोगशिल शेतकरी जनार्धन बालासाहेब आवरगंड व त्यांच्या पत्नी सौ मिराताई जनार्धन आवरगंड यांनी लाकडी घाण्यावरील तेलनिर्मीती उद्योग सुरु केला. लोकांना लाकडी घाण्यावरील शुद्ध तेल खाण्यासाठी उपलब्ध करुन देण्याकरिता त्यांनी हा उदयॊग सुरु केला आहे. असं म्हटलं जात की, शेतक-यांना पीकवता येतं पण विकता येत नाही. मात्र या शेतकरी दाम्पत्यानं आपल्या यशस्वी प्रयोगातून हे खोट ठरवलं. आपल्या शेतीत त्यांनी करडी, अंबाडी,भुईमुग शेंगदाणा,तीळ,सुर्यफूल,मोहरी अशा तेलबियांची लागवड करुन त्यापासून लाकडी घाण्यावर शुद्ध असं तेल काढून त्यांनी नागरिकांना उपलब्ध करून दिले.
पुढचे चार दिवस अतिमहत्वाचे, महाराष्ट्रात पाऊस थैमान घालणार..
कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाचे सहकार्य
हा लाकडी घाण्याचा उयोग उभारताना कृषी विभाग आत्मा संघटना आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृह उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. शेतकरी जनार्धन आणि पत्नी मीराताई हा उदयॊग उभारण्याची संकल्पना तर मांडली मात्र कोणताही उद्योग सुरु करताना अडचणींचा डोंगर हा पार करावाच लागतो. या शेतकरी दाम्पत्यालाही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला.
एकूण किती खर्च आला :
शेतकरी जनार्धन म्हणतात की, ते तीन वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहेत. या शुद्ध तेल निर्मितीतून नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी त्यांनी हा लाकडी घाणा टाकण्याचा निश्चय केला. पुढे ते असंही म्हणतात की त्यांना बँकेकडून बऱ्याच अडचणी आल्या. मात्र नंतर बँकेकडूनही सहकार्य मिळाल्याचं ते सांगतात. यानंतर मात्र लाकडी घाण्याचं महत्व शिवाय लोकांना याबाबतचे असलेले गैरसमज दूर करण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्या. या लाकडी घाण्यासाठी जवळपास १० लाख रुपयांचा खर्च आला. शिवाय जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मदतही मिळाली. आता हा घाणा तयार होऊन एक वर्ष झाल्याचं ते सांगतात.
विशेष म्हणजे ओंकार बचत गटाच्या सहकार्याने ते स्वतःच्या शेतातील गावरान आंब्यापासून स्वादिष्ट लोणचे तयार करुन विक्री करतायेत. अथक प्रयत्न आणि आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलंय. तुमच्यासाठी ही माहिती आणली होती आमचे प्रतिनिधी आनंद ढोणे पाटील यांनी.
आता उपचारासाठी मोदी सरकार देणार 5 लाख रुपये, असा घ्या लाभ..
उन्हाळ्यात काकडीच्या शेतीतून चांगले पैसे कमवा, काकडी शेतीची योग्य पद्धत जाणून घ्या
शेतकऱ्यांनो खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना
Published on: 26 April 2023, 10:45 IST