News

राज्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. राज्य आणि केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी कोणताही हमीभाव ठरवण्यात येत नाही. त्यामुळे कधी निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेत भाव न मिळाल्यामुळे शेतकरी संकटात सापडत आहेत. कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने मोदींना शुभेच्छा देत आत्महत्या केली आहे.

Updated on 19 September, 2022 3:34 PM IST

राज्यातील शेतकरी आत्महत्येचे (Farmer suicide) सत्र सुरूच आहे. राज्य आणि केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतमालासाठी (Agricultural Commodity Guarantee) कोणताही हमीभाव ठरवण्यात येत नाही. त्यामुळे कधी निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेत भाव न मिळाल्यामुळे शेतकरी संकटात सापडत आहेत. कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने मोदींना शुभेच्छा देत आत्महत्या केली आहे.

राज्यातील सरकार (State Govt) फक्त आत्महत्यामुक्त शेतकरी असे नारे देत आहे मात्र शेतकरी आत्महत्या थांबण्याचे दिसत नाही. शेतमालाला भाव न मिळणे, सावकाराचा तगादा आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत.

पुणे (pune) जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्यातील वडगाव आनंद गावामध्ये राहणारे शेतकरी दशरथ लक्ष्मण केदारी (Farmer Dashrath Laxman Kedari) या शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना शुभेच्छा देत आत्महत्या केली आहे.

शेतकरी दशरथ लक्ष्मण केदारी यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. दशरथ केदारी हे अल्पभूधारक शेतकरी होते. चिट्ठीत लिहल्यानुसार फायनान्स वाले दमदाटी करत होते तसेच अपशब्ध देखील वापरत होते.

पालक लागवड करून 20 दिवसांत करा 1 लाखांची कमाई; वापरा ही नवीन पद्धत

शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचे या शेतकऱ्याने चिट्ठीमध्ये लिहून ठेवले आहे. मोदींचा शेतीवर कंट्रोल नाही त्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहे तसेच शेवटी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आत्महत्या केली आहे.

दशरथ यांच्या मालकीची एक एकर शेती आणि एक दुचाकी होती. या दोन्हीसाठी त्यांनी अडीच लाखांचे कर्ज काढले होते. या कर्जाच्या पैशातून मे महिन्यात त्यांच्या हाती कांद्याचं पीक आले. पण तेव्हा कांद्याचा दर 10 रुपये होता.

म्हणून त्यांनी कांदा न विकता त्याची साठवणूक केली. त्यासाठी देखील त्यांनी खर्च केला. पण कांद्याचा भाव काही वाढला नाही आणि पावसामध्ये त्यातील अर्धा कांदा खराब झाला त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता.

आज सुनावणी; संजय राऊतांना जामीन मिळणार?

त्यानंतरही शेतकरी दशरथ केदारी यांनी पुन्हा टोमॅटो आणि सोयाबीनचे पीक घेतले पण पावसाने तेही वाया गेले. तसेच संततधार पावसाने सोयाबीनचे पीकही खराब झाले. सोयाबीन पिकांचा पंचनामा करावा यासाठी दशरथ 17 सप्टेंबरला तलाठी कार्यालयात गेले. दोन तास तिथे बसून पंचनाम्याची मागणी त्यांनी केली.

मात्र त्यालाही कोणी प्रतिसाद न दिल्याने दशरथ केदारी यांनी स्वतःच्या शेतात जाऊन विष प्राशन केले आणि त्यानंतर शेततळ्यामध्ये उडी घेत आत्महत्या केली आहे. अशा किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारला अजूनही पाहायच्या आहेत असा सवाल संतप्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:
Mahindra SUV: महिंद्राच्या 4 जबरदस्त एसयूव्ही कार बाजारात धमाका करण्यासाठी सज्ज; या गाड्यांचा आहे समावेश
इंजिनिअर दादा तुमचा नादच खुळा! मन की बात मधून प्रोत्साहित होत पिकवले ड्रॅगन फ्रूट; कमावतोय लाखों

English Summary: A farmer committed suicide while wishing the Prime Minister
Published on: 19 September 2022, 03:34 IST