2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले. असे असताना मात्र अनेक नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये मधुकर पिचड देखील भाजपमध्ये गेले होते. आता अकोले (akole) येथील अगस्ती सहकारी साखर कारखानाची निवडणूक पार पडली.
यामध्ये सत्ता भाजप नेते मधूकर पिचड यांच्या व त्यांच्या गटाच्या हातून गेली आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत मविआच्या (mva) गटाने बाजी मारली आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
अगस्ती कारखाना निवडणूकीत गेली 28 वर्षांपासून असलेली सत्ता भाजप नेते मधूकर पिचडांनी गमावली आहे. आमदारकी, ग्रामपंचायत आणि आता कारखाना निवडणूकीत मधुकर पिचड यांच्या गटास पराभवाचा धक्का बसत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
Tractor Subsidy Scheme: सरकार देतंय ट्रॅक्टर खरेदीवर 50% अनुदान, असा करा अर्ज
या निवडणुकीत पिचड गटाच्या विराेधात असलेल्या महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांचा दणदणीत विजय झाला आहे. दरम्यान 2019 मध्ये पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर मोठी टीका केली गेली.
झेंडूचा भाव 70 रुपये किलोपर्यंत, नवरात्रीपूर्वीच फुलांची मागणी वाढली, शेतकरी समाधानी
त्यानंतर पिचड गट अनेक निवडणुकीत पराभूत होत आहे. आता कारखाना निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला. यामुळे येणाऱ्या निवडणूका देखील त्यांच्यासाठी आव्हान ठरणार आहेत.
महत्वाच्या बातम्या;
बातमी कामाची! शेतकऱ्यांनो बोगस खते कशी ओळखायची? वाचा साधी सोप्पी पद्धत
दुबईमधील लाखो रुपयांची नोकरी सोडून केली स्ट्रॉबेरीची शेती, आज कमवतोय लाखो, एकाच पिकात घेतली तीन पिके..
लंम्पी रोग आता हायकोर्टात, राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली दाखल
Published on: 26 September 2022, 03:37 IST