News

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रकरण काही थांबताना दिसत नाही. महाराष्ट्रातील गेल्या २३ दिवसांमधील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तब्बल ८९ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. शेतकऱ्यांनी उचललेल्या या पाऊलामुळे शिंदे सरकारसमोर मोठे आव्हान उभे आहे.

Updated on 24 July, 2022 1:25 PM IST

महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रकरण काही थांबताना दिसत नाही. महाराष्ट्रातील गेल्या २३ दिवसांमधील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी (Farmers) आत्महत्या (Sucide) केली आहे. तब्बल ८९ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. शेतकऱ्यांनी उचललेल्या या पाऊलामुळे शिंदे सरकारसमोर (Shinde Govt) मोठे आव्हान उभे आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्यात एकही शेतकरी आत्महत्या (Farmer suicide) करणार नाही, अशी घोषणा केली होती. सरकार स्थापन होऊन २४ दिवस उलटले तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. शेतकऱ्यांची काळजी असलेले कृषी मंत्रालय मंत्र्याविना ओस पडले आहे. आत्महत्या केलेल्या बहुतांश शेतकरी औरंगाबाद, बीड आणि यवतमाळ येथील आहेत.

महाराष्ट्रात गेल्या २३ दिवसांत ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये बीडमधील 13, यवतमाळमधील 12, परभणी 6, जळगाव 6, जालना 5, बुलडाणा 5, उस्मानाबाद 5, अमरावती 4, वाशिम 4, अकोला 3, नांदेड 2, भंडारा-चंद्रपूर 2 आणि औरंगाबादमधील 22 जणांचा समावेश आहे.

शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात पक्षी येताच वाजते घंटा, इंजिनिअरही या जुगाडासमोर फिक्के

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत मंत्रिमंडळाच्या तीन बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये शहरांची नावे बदलणे, सरपंचाची थेट निवडणूक, आरे कारशेड, एमएमआरडीएला कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये किसान चेतना अभियान, वसंतराव नाईक कृषी स्वावलंबी मिशनची स्थापना केली आहे. मात्र या दोन्ही योजना मंत्रालयात अडकल्या आहेत.

PM kisan: पीएम किसान लाभार्थ्यांना अलर्ट! यामुळे खात्यात जमा होणार नाही १२वा हफ्ता

एक जानेवारी ते जून या सहा महिन्यांत मराठवाड्यात ३०६ तर विदर्भात ३६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावेळी एकनाथ शिंदे राज्याचे नगरविकास मंत्री होते आणि शिंदे गटाचे दादा भुसे कृषीमंत्री होते.

महत्वाच्या बातम्या:
भावांनो कमी खर्चात कमवा चौपट नफा! करा हा व्यवसाय आणि बना लखपती
वरुणराजाचा कहर! मुसळधार पावसाने पिके पाण्याखाली, भाताशेतीबरोबर भाजीपाला पिके सडण्याचा धोका

English Summary: 89 farmers committed suicide in Maharashtra in 23 days
Published on: 24 July 2022, 01:25 IST