News

शिर्सुफळ येथे सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आसल्याने याचा शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. शेतात तसेच पोल्ट्रीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. तसेच शिर्सुफळ येथे रस्त्यांची कामे चालु असून ओढ्यांवरील पुलांची अर्धवट कामे झाल्याने तसेच शेतक-यांना येण्या जाण्यासाठी पर्यायी रस्ता देण्यात आला परंतु पहिल्याच पावसात हा रस्ता वाहुन गेल्याने शेतक-यांना याचा मोठा फटका बसला.

Updated on 02 September, 2022 1:27 PM IST

शिर्सुफळ येथे सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आसल्याने याचा शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. शेतात तसेच पोल्ट्रीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. तसेच शिर्सुफळ येथे रस्त्यांची कामे चालु असून ओढ्यांवरील पुलांची अर्धवट कामे झाल्याने तसेच शेतक-यांना येण्या जाण्यासाठी पर्यायी रस्ता देण्यात आला परंतु पहिल्याच पावसात हा रस्ता वाहुन गेल्याने शेतक-यांना याचा मोठा फटका बसला.

दरम्यान, ओढ्याचे सर्व पाणी गावात तसेच शेतात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी पंचनाम्यासाठी प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांच्याकडुन करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.

शिर्सुफळ येथील शेतकरी किसन देवकाते यांच्या पोल्ट्रीत पुराचे पाणी शिरल्याने त्यांच्या जवळपास आठ हजार पाचशे कोंबड्या मरण पावल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाकडुन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देवकाते कुटुंब करत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे या पिलांना वाचवणे अवघड झाले.

गाई म्हशी असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दीड लाख रुपये, वाचा काय आहे योजना

तसेच पुराचे पाणी घरामध्ये शिरले आहे. अन्न धान्य पाण्यात वाहून गेले आहे. आमचा संसार उघड्यावर आला आहे. घराच्या भिंती चिरटल्या आहेत. आम्हाला शासनाने नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी, असे अशोक शिंदे यांनी सांगितले आहे. अनेकांच्या घरात या पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे अनेक वस्तू देखील भिजल्या आहेत.

धक्कादायक! कमी गुण दिल्याने विद्यार्थ्यांची शिक्षकांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल..

यामुळे नुकसान फार मोठया प्रमाणावर झाले आहे व त्या नुकसानीचा पंचनामा होऊन. नुकसानीची भरपाई होणे गरजेचे आहे. लोकांच्या तीव्र भावना आहे. यावर शासनाने कायम स्वरूपी उपाय करणे गरजेचे आहे, अशी मागणी सरपंच आप्पासाहेब आटोळे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या;
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला, चर्चांना उधाण..
आता उद्धव ठाकरेसोबत मराठा ताकद! संभाजी ब्रिगेडनंतर आता मोठ्या संघटनेने दिला पाठिंबा..
केजरीवाल यांनी विश्वासदर्शक मांडला आणि विरोधी आमदार पळाले, एकही आमदार फुटला नाही...

English Summary: 8500 chickens died due flood water entering poultry farm, loss of lakhs to farmers
Published on: 02 September 2022, 01:27 IST