News

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी (Central Government Employee) त्यांच्या डीएमध्ये वाढ तसेच थकबाकी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते, असे वृत्त आहे. वाढती महागाई पाहता महागाई भत्ता (Dearness Allowance) 4 ते 5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने DA दिला जात आहे.

Updated on 18 July, 2022 7:25 PM IST

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी (Central Government Employee) त्यांच्या डीएमध्ये वाढ तसेच थकबाकी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते, असे वृत्त आहे. वाढती महागाई पाहता महागाई भत्ता (Dearness Allowance) 4 ते 5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने DA दिला जात आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची 18 महिन्यांची डीएची थकबाकी आहे. कोरोना (Corona) विषाणूमुळे केंद्र सरकारने (Central Government) डीए बंद ठेवला होता. कर्मचारी सातत्याने DA देण्याची मागणी करत आहेत.

परंतु आतापर्यंत डीएमध्ये वाढ आणि थकबाकी DA देण्याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. या वर्षी मार्च महिन्यात सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात डीएबाबत मोठी घोषणा करू शकते.

...आत्ताशीक आमची आठवण आली काय? शेतकऱ्यांनी आमदाराला विचारला जाब

DA 5 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो

केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ केल्यास DA 39 टक्के होईल. वास्तविक, AICPI निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता ठरवला जातो. AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवरून यावेळच्या महागाई भत्त्यात 4 ते 5 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

जून महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा किरकोळ महागाईचा दर वाढला आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्याची खात्री आहे. डीएमध्ये वाढ झाल्यामुळे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

महाबळेश्वरला जात असाल तर थांबा! महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी, 16 गावांचे स्थलांतर

पगार खूप वाढेल

जर सरकारने DA 34 टक्क्यांवरून 39 टक्के केला, तर सध्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये असेल. 34 टक्क्यांनुसार त्यांचा महागाई भत्ता 6,130 रुपये येतो.  जर आता DA 39% असेल तर कर्मचाऱ्यांना 7,020 रुपये महागाई भत्ता मिळेल.

English Summary: 7th pay commission da increase soon
Published on: 18 July 2022, 07:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)