आज सोमवार तुर्कस्तानसाठी भयानक दिवस होता. तुर्कस्तानमध्ये सोमवारी सकाळी भूकंपाच्या जोरदार धक्क्याने संपूर्ण देश हादरला. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला असून या भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. स्थानिक वेळेनुसार तुर्कस्तानमध्ये पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी भूकंप आला. सध्या बचावकार्य वेगाने सुरू आहे.
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली आहे. 7.8-रिश्टर स्केलच्या भूकंपाने तुर्कस्तानला हादरा दिला, त्यानंतर आणखी एक मजबूत भूकंप या प्रदेशातील अनेक प्रांतांमध्ये जाणवला, ज्यामुळे अनेक इमारती कोसळल्या. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू गॅझियानटेपपासून सुमारे 33 किलोमीटर (20 मैल) आणि नूरदगी शहरापासून सुमारे 26 किलोमीटर (16 मैल) अंतरावर होता.
यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, ते 18 किलोमीटर (11 मैल) खोलीवर केंद्रित होते.दक्षिण-पूर्व तुर्कीमध्ये या भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यासोबतच भूकंपामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्याचवेळी सीरियामध्येही भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
शेतकऱ्यांनो स्वच्छ दूध उत्पादनाची 'ही' आहेत सुत्र
तूर्कस्तानाप्रमाणे सीरियामध्ये देखील भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला आहे. अलेप्पो आणि हमा शहरांमधल्या अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे. लोक पहाटेच्या साखरझोपेत असताना हा भूकंप झाला.
पशुधन मिल्किंग मशीन : दुग्धव्यवसायीक शेतकऱ्यांची पहिली पसंद
सीरियन सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात भूकंपामुळे आतापर्यंत ४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींची संख्या ५१६ इतकी झाली आहे. तूर्कस्तानशिवाय सायप्रस, ग्रीस, जॉर्डन, लेबनान, सीरिया, इराक, जॉर्जिया आणि अर्मेनिया या देशांमध्ये देखील भूकंपाचे हादरे बसले आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या देशांमधील भूकंपाचे फोटो व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
घर बांधण्यासाठी अजून काय हवं!! स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण, घर बांधणारांना दिलासा
शेतकऱ्यांनो मुरघास निर्मिती तंत्रज्ञान
काय सांगताय! आता 'या' गाई देणार दररोज 140 लिटर दुध, गायींवर नवा प्रयोग...
Published on: 06 February 2023, 02:14 IST