News

शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. मुसळधार पाऊस, तर कधी दुष्काळाला सामोरे जावे लागते. यामुळे त्यांना मदतीची गरज भासते. गेल्यावर्षी पीक विमा 2021 ची शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच 25 टक्के आगाऊ रक्कम जमा करण्यात आली होती. ज्यातील 75 टक्के उर्वरित रक्कम आता (Financial) तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

Updated on 23 September, 2022 4:16 PM IST

शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. मुसळधार पाऊस, तर कधी दुष्काळाला सामोरे जावे लागते. यामुळे त्यांना मदतीची गरज भासते. गेल्यावर्षी पीक विमा 2021 ची शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच 25 टक्के आगाऊ रक्कम जमा करण्यात आली होती. ज्यातील 75 टक्के उर्वरित रक्कम आता (Financial) तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, 2021 मध्ये बऱ्याच जिल्ह्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढून शेतकऱ्यांना (Agriculture) पात्र करण्यात आले होते. यानंतर राज्यात 23 जिल्ह्यांत अधिसूचना प्रकाशित करण्यात आल्या होत्या. या अधिसूचना जारी केल्यानंतर शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ (Financial) रक्कम वितरीत करण्यात आली होती. असे असताना मात्र शेतकऱ्यांना (Agriculture Information) उर्वरित पिक विम्याची प्रतीक्षा होती.

यामध्ये जर 20 हजार रुपये पीक विमा (Crop Insurance Scheme) मंजूर झाला असेल त्यातील 25 टक्के रक्कम म्हणजेच 5 हजार रुपये रक्कम तुमच्या खात्यावर (Account) जमा झाली असेल तर त्यातील उर्वरित 15 हजार रुपये रक्कम आता खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांना राहिलेली रक्कम मिळणार आहे.

दुधाचे दर पुन्हा वाढणार, मदर डेअरी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची शक्यता

यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच आता अतिवृष्टीमुळे जून ते ऑगस्ट 2022 मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पिकाच्या नुकसानीची भरपाई देखील पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या (Agriculture in Maharashtra) खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

Cotton Rate: शेतकऱ्यांना दिलासा! यंदा देखील कापूस तेजीतच राहणार, मिळणार 'इतका' भाव

यासाठी राज्य सरकारकडून तब्बल 3 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. मात्र अनेक ठिकाणी अनेक गावे मदतीपासून वंचीत आहेत, यामुळे येथील शेतकऱ्यांनी देखील मदतीची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या;
कौतुकास्पद! साखर कारखान्याकडून मोठी घोषणा, शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला एक क्विंटल साखर देणार फुकट
शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाकडून ट्रॅक्टर, कुलींग व्हॅन, अर्थमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Sale Land: शेत जमीन खरेदी- विक्रीमध्ये अमूलाग्र बदल, शेतकरी चिंतामुक्त...

English Summary: 75 percent crop insurance amount distributed, big relief farmers
Published on: 23 September 2022, 04:16 IST