News

राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांचे ऊस तोडणी मुकादमाकडून मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे. यामुळे राज्यातील ऊस वाहतूकदार मोठया प्रमाणात आर्थिक संकटात सापडले आहेत.

Updated on 27 March, 2023 1:41 PM IST

राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांचे ऊस तोडणी मुकादमाकडून मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे. यामुळे राज्यातील ऊस वाहतूकदार मोठया प्रमाणात आर्थिक संकटात सापडले आहेत.

गेल्या २ वर्षात राज्यामध्ये २२ जिल्हयातील १०२५८ मुकादमांनी ४४६ कोटी रूपयाची वाहतूकदारांची फसवणूक केलेली आहे. सदरची आकडेवारी ही राज्यातील साखर कारखान्याकडून अधिकृत असून थेट वाहतूकदारांनी दिलेली रक्कम पकडल्यास रक्कम जवळपास १ हजार कोटी रूपयाच्या घरात आहे.

दिवसेंदिवस राज्यामध्ये मुकादमाकडून फसवणुकीचे प्रमाण वाढतच चालले आहे. यामुळे ऊस वाहतूकदार मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

याकरिता राज्यातील साखर कारखान्यांना व ऊस वाहतूकदारांना मजूर पुरवठा करत असताना सदर मजूराची शासनाने निर्माण केलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी मजूर महामंडळाकडे ऊस तोडणी मजूरांची नोंदणी करण्यात यावी. नोंद झाल्याशिवाय कारखाना व वाहतूकदार यांचा करार न करण्याबाबत आदेश साखर कारखांन्याना काढण्यासंदर्भाचे निवेदन महाराष्ट्र राज्य साखर संघाचे कार्यकारी संचालक यांना देण्यात आले.

शेतकऱ्यांनो वाळवी कीटकापासून घ्यावयाची काळजी

यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. यावर अजूनही काही निर्णय झाला नाही. यामुळे मात्र अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही 12 कोटींचा रेडा पाहण्याचा मोह! शेतकऱ्यांचे केले कौतुक..
कारल्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला भाव, शेतकऱ्याला मिळताहेत लाखो रुपये..
राज्यात गहू काढणीला वेग, पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा कष्टमय प्रवास...

English Summary: 446 crores from 10258 lawsuits in 22 districts in the state in 2 years Fraud of Transporters'
Published on: 27 March 2023, 01:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)