शेतकरी सध्या अनेक अडचणीचा सामना करत आहेत. यामुळे राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकर्यांच्या दुष्काळग्रस्त भागाला राज्य सरकार दुष्काळमुक्त करेल. यामुळे शेतकरी आपले उत्पन्न वाढवेल आणि तो सक्षम बनेल.
या योजनेअंतर्गत सध्या राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये एकूण 5 हजार 142 गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेत गाव हे केंद्र घटक मानून कृषी व्यवसाय आणि शेतकऱ्यांची क्षमता बांधणीकरिता लोकसहभागातून नियोजन करण्यात येणार आहे. शेतकर्यांना राज्यातील पाणी व हवेनुसार शेती करण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. तसेच जमिनीच्या मातीचीही चाचणी घेण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
यामध्ये शेळीपालन, तलावांचे उत्खनन व मत्स्यपालनाचे उद्योग उभारले जातील. पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी ठिबक सिंचन लागू केली जाईल. या योजनेंतर्गत शेतकर्यांना सिंचन सुविधा शिंपड्यांच्या संचाद्वारेही देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. योजनेंतर्गत राज्यातील लघु व मध्यमवर्गीय शेतकर्यांना फायदा होणार आहे.
राज्य सरकारने या योजनेसाठी 4000 कोटी रुपयांचे बजेट वाटप केले आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन राज्यातील दुष्काळग्रस्त भाग दुष्काळमुक्त करेल. ज्यामध्ये शेतकरी शेती करू शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर जमिनी ओलिताखाली येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन मुख्य पृष्ठावर असणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यादीच्या 5142 गावांच्या यादीवर क्लिक करावे.
याठिकाणी तुमच्या गावांची यादी तुम्हाला दिसेल. यामुळे आता ज्या गावांचा समावेश आहे त्यानाच चांगलाच फायदा होणार आहे. राज्य सरकार ही योजना अत्यंत व्यवस्थित हाताळणार आहे. यामुळे आता याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
फिर हेरा फेरी नाही, ही तर आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, पैसे होत आहेत दुप्पट
मोदींचे 'हे' कार्ड शेतकऱ्यांसाठी ठरतय वरदान, शेतकऱ्यांना लाखांमध्ये मिळतंय कर्ज..
महिला आर्थिक विकास महामंडळाचा महिला, शेतकरी आणि उद्योजकांसाठी मोठा निर्णय, आता फायदाच फायदा..
Published on: 03 April 2022, 02:49 IST