News

एका शेतकऱ्याच्या कांद्याला कसा भाव मिळाला यावरून तुम्हाला अंदाज येईल. त्यांनी विकायला नेलेल्या ४० पोती कांद्यासाठी (Onion) त्याला दमडीमोल रक्कम मिळाली, वरुन त्याला ७ रुपये हे आडतवाल्यालाच (कांदा खरेदी करणाऱ्याला) द्यावे लागले आहेत. यामुळे यावरून कांद्याची परिस्थिती तुमच्या लक्षात येईल.

Updated on 20 May, 2022 3:47 PM IST

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर पडले असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. एका बाजुला साठवलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे अर्थिक फटका बसत आहे. अनेक शेतकरी सध्या कांदा खराब होईल या भीतीने कांदा विक्री करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

असे असताना आता अंजनगाव खेलोबा (ता.माढा) (Solapur) इथल्या एका शेतकऱ्याच्या कांद्याला कसा भाव मिळाला यावरून तुम्हाला अंदाज येईल. त्यांनी विकायला नेलेल्या ४० पोती कांद्यासाठी (Onion) त्याला दमडीमोल रक्कम मिळाली, वरुन त्याला ७ रुपये हे आडतवाल्यालाच (कांदा खरेदी करणाऱ्याला) द्यावे लागले आहेत. यामुळे यावरून कांद्याची परिस्थिती तुमच्या लक्षात येईल.

त्यांना कांद्यातून नफा तर सोडाच, पण उत्पादन खर्चही मिळत नाही, शिवाय आपल्याच कांदा विक्रीसाठी आपल्याच खिशातले पैसे या शेतकऱ्याला द्यावे लागले आहेत. यामुळे शेती करायची तरी कशी असा प्रश्न निर्माण होत आहे. युवा शेतकरी ओंकार पाटेकर यांच्यासोबत हा अनुभव आला आहे.

Fish farming; शेतकऱ्यांनो तलावाचा वापर न करता करा मत्सपालन, जाणून घ्या, आहे खूपच फायदेशीर..

त्यांनी ४० पोती कांदा विक्रीसाठी नेला. यावेळी हमाल, आडत खर्च, गाडी भाडे इत्यादी सर्व खर्च वजा करुन त्यांना उत्पादन खर्चही मिळाला नाही. तसेच आडतवाल्यालाच स्वतःच्या खिशातून ७ रूपये देण्याची नामुष्की या शेतकऱ्यावर आली आहे. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

सध्या राज्यात कांद्याला प्रतिकिलो पन्नास पैसे ते १ रुपये भाव मिळत आहे, यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा झालेला खर्च देखील मिळणार नाही. त्यांचा ४० पोती असलेला कांदा प्रतिकिलो १ रूपये दराने विकला गेला. त्याचे १८८३ रूपये त्यांना मिळाले. गाडी खर्च, हमाल खर्च, तोलाई खर्च हे सगळं मिळून १९५४ रुपये झाले. आडतवाल्यालाच ७ रुपये खिशातून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. याची सध्या चर्चा सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा! शेतकऱ्यांना देणार मोफत भाज्या, कडधान्य..
मोठी बातमी! राज्यात पुन्हा शेतकऱ्यांनाचा संप? सोमवारी होणार मोठा निर्णय
Fish farming; शेतकऱ्यांनो तलावाचा वापर न करता करा मत्सपालन, जाणून घ्या, आहे खूपच फायदेशीर..

English Summary: 40 sacks of onion, the farmer had to pay
Published on: 20 May 2022, 03:47 IST