पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी योजना आहे. आपल्याला माहित आहेच की, या योजनेच्या माध्यमातून वर्षातून सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग करण्यात येतात. परंतु बऱ्याच पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे सरकार कडून या योजनेमध्ये बरेच बदल करण्यात आले.
त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे eKYC होय. आता जर तुम्हाला दोन हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला निर्धारित मुदतीच्या अगोदर ई केवायसी करणे बंधनकारक आहे.
नक्की वाचा:PM KISAN! आनंदाची बातमी; आता पीएम किसान योजनेचा हप्ता येणार 4,000 रुपये
जर ई-केवायसी केली गेली नाही तर पुढचा हप्ता मिळणार नाही. जवळ जवळ एक आठवडा अजून बाकी असून म्हणजेच अंतिम तारीख 31 जुलै 2022 असून या मुदतीपूर्वी ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे.
तुम्हाला जर ई-केवायसी करायचे असेल तर तुम्ही पीएम किसान पोर्टल वर जाऊन करू शकता किंवा बायोमेट्रिक आधारित ईकेवायसी करायचे असेल तर जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन देखील करता येऊ शकते.
नक्की वाचा:पीएम कुसुम योजनेत फक्त 10 टक्के गुंतवणूक करा आणि कमवा लाखों रुपये; सरकार देतंय अनुदान
अशा पद्धतीने करू शकता तुम्ही घरबसल्या
ई-केवायसी
1- सगळ्यात अगोदर pmkisan.nic.in या संकेत स्थळावर जाऊन त्या ठिकाणी असलेल्या फार्मर कॉर्नर या ठिकाणी ई-केवायसी पर्यायावर क्लिक करावे.
2- नंतर ओटीपी आधारित ई केवायसी पर्यायाच्या खाली तुमचा आधार नंबर टाकावा.
3-नंतर सर्च ऑप्शन वर क्लिक करावे.
4- त्यानंतर तुमचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा आणि गेट ओटीपी वर क्लिक करावे.
5- त्यानंतर आलेला ओटीपी सबमिट करावा.
6- तुम्ही नमूद केलेल्या सगळ्या तपशिलांची पडताळणी केल्यानंतर तुमचे ई केवायसी पूर्ण केले जाते.
Published on: 24 July 2022, 09:40 IST