आकांक्षी जिल्हा (NITI आयोग) अंतर्गत कृषी विभागाचे सूक्ष्म सिंचन क्षेत्र वाढवणे, पंतप्रधान फसल विमा योजने (Prime Crop Insurance Scheme) अंतर्गत खरीप आणि रब्बी (Kharif and Rabbi) विमा संरक्षित क्षेत्र वाढवणे, बियाणे वितरण, मुख्य पिकांची उत्पादकता वाढवणे, उच्च मूल्याच्या पिकांचे क्षेत्र वाढवणे, खरीप आणि रब्बी मुख्य पिकांचे उत्पादन वाढवणे, जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण इत्यादी योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
आकांक्षी जिल्ह्याच्या यादीत उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचा समावेश झाला आहे. NITI आयोगाने कृषी आणि जलसंधारण क्षेत्रात सलग दोन वर्षे केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी तीन करोड रुपयांचे बक्षीस उस्मानाबाद जिल्ह्याला मिळाले आहे. मिळालेल्या बक्षीस रकमेतून पालकमंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांच्या संकल्पनेतून व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण ५०८ रुंद वरंबा व सारीयंत्रे, १५८७ स्पायरल सेपरेटर व १५०० स्थानिक बियाणे कीटकांचे वाटप करण्यात आले.
ठरलं तर! पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता 'या' तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली पेरणी करून स्थानिक भाजीपाला, बियाणे कीड व बियाणे खरेदी करून स्थानिक जातीच्या बियाण्यांचा वापर वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री साहेब पानी दया ! शेतकऱ्यांचे अजित पवार यांना निवेदन
ऐन उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून तीव्र उन्हाच्या झळा लागून गळ्याला सोक पडत आहे. राज्यात अनेक ठिकाणी वाढत्या तापमानामुळे (Temperature) पिण्याचा (Water) आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. त्यामुळे सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या देवडी गावाला आष्टी उपसा सिंचन योजनेतून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
राजू शेट्टींचा शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यावर जोरदार घणाघात, म्हणाले...
त्याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जावेत अशी मागणी करणारे लेखी निवेदन देवडी गावचे सरपंच व उपसरपंच यांनी पवारांना दिले. देवडी गावाजवळुन आष्टी उपसा सिंचन योजनेचा कालवा गेला असून आष्टी उपसा सिंचन योजनेतून परिसरातील पाझर तलाव, लहान बंधारे भरून दिल्यास गावची पाणी समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे म्हणणे येथील शेतकऱ्यांचे आहे. तर पावसाळ्यात उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते.
तेच पाणी आष्टी तलावात सोडून देवडी गावच्या परिसरात आल्यास पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वास येथील शेतकऱ्यांना वाटत आहे. या योजनेत पूर्वी देवडी गावचा समावेश होता परंतू प्रशासकीय पातळीवरून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने तो प्रश्न मागे पडल्याचे गावकरी सांगत आहेत.
अजितदादा तुम्ही शेतकरी, तुम्हाला शेतीतील चांगले कळते : उद्धव ठाकरे
देवडी गावाला नियमित पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पावसाळा सोडला तर गावातील शेती पिकवणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे येथील शेतकरी हतबल झाला असून गाव सोडून लोक जाऊ लागले आहेत. त्यामुळे आष्टी उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळाले तर हे क्षेत्र संपूर्ण बागायती होईल असा विश्वास गावच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पावसाळ्याच्या जीवावर पिक घेऊन त्यावरच समाधान येथील शेतकऱ्यांना मानावे लागत आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जनावरे सांभाळणे येथील शेतकऱ्यांना जिकिरीचे होऊन बसले आहे. गावाला पाणी नसल्याने अनेक गावकरी शहराकडे स्थलांतरीत झाले आहेत. तसेच अद्याप देखील होत आहेत. काही शेतकरी शेती पिकवण्या ऐवजी दुग्ध व्यवसाय करत आहेत. मात्र, जनावरांना पिण्यासाठी लागणारे पाणी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने तोही व्यवसाय अडचणीत आला आहे.
आनंदाची बातमी : आमिर खान यांनी 'सत्यमेव जयते फार्मर कप' ची केली घोषणा; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
Published on: 02 May 2022, 06:35 IST