राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न खूप गंभीर होत चालला आहे. आता मे महिना संपत आला तरी अनेकांचे ऊस अजूनही शेतातच आहेत. अनेक शेतकरी काळजावर दगड ठेवून ऊस पेटवून देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अनेक शेतकरी सध्या ऊस पेटवून देत आहेत. काही शेतकऱ्यांनी यामुळे आत्महत्या देखील केल्या आहेत.
असे असताना आता साताऱ्यात कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे यांनी स्वतःचा तीन एकरातील ऊस पेटवून दिला. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. तोडणीचा कालावधी होऊन देखील ऊस तुटला गेला नाही. यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
त्यांनी यावेळी राज्यकर्त्यांमुळे ऊस पेटवून देण्याची वेळ आली असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी दोन्ही साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्याची मागणीही केली आहे. तसेच यावेळी ऊस तोडण्यासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांनी ऊसाला पालापाचोळा जास्त असल्याचे कारण त्यांना दिले.
श्रीलंकाच नाही तर इतर ६९ देशही आहेत कंगाल, या गोष्टी आल्या अंगलट, जाणून घ्या..
तसेच त्यांनी ऊस तोडण्यासाठी नकारही दिला. यामुळे त्यांना शाल श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचाही त्यांनी सत्कार केला. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 20 महिने झाले ऊसाचे पीक शेतात उभे आहे. अद्याप उसाला तोड न आल्याने ऊसाच्या वजनात घट होणार आहे. यामुळे मोठे नुकसान होणार आहे.
यामुळे राज्य सरकारचा निषेध करत तीन एकर क्षेत्रातील ऊस पेटवून दिला असल्याचे शेतकरी राजेंद्र बर्गे यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे. अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आपले ऊस पेटवून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या;
टोमॅटोने हटवला दुष्काळ! टोमॅटो शंभर रुपये किलो, शेतकरी झाले मालामाल
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला नुकसानीचा पहिला हप्ता, शेतकऱ्यांना दिलासा
मोठी बातमी! दुधाला एफआरपी मिळणार, मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय
Published on: 24 May 2022, 05:10 IST