News

नाशिकमध्ये व्यापाऱ्यांकडून डाळिंब खरेदी करून सुमारे १३ लाखांची फसवणूक करणाऱ्या बागवान नावाच्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Updated on 20 June, 2023 2:13 PM IST

नाशिकमध्ये व्यापाऱ्यांकडून डाळिंब खरेदी करून सुमारे १३ लाखांची फसवणूक करणाऱ्या बागवान नावाच्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

सुमारे दोन वर्षांपूर्वी शहरातील फळविक्रेता मोहसीन सय्यद याच्याकडून सुमारे १३ लाख रुपयांचे डाळिंब खरेदी करून नेले होते. शेख अमजद शेख मोहम्मद बागवान असे त्याचे नाव आहे.

मोहसीन सैय्यद यांनी वारंवार पैसे मागितले असता, बागवान याने देण्यास टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देत होता. यामुळे सैय्यद यांनी येवला शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.

येत्या 72 तासांत मान्सून महाराष्ट्र व्यापणार! हवामान विभागाकडून मोठी माहिती..

दरम्यान, शहर पोलिसांनी बागवान याला ताब्यात घेतले आहे. त्याला येथील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष उपस्थित केले असता, न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गाईच्या दुधाला लिटरला 75 रुपये दर तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये दर द्या, सदाभाऊ खोत यांची मागणी

बागवान हा गुन्हा घडल्यापासूनच फरारी होता. यामुळे पोलीस तपास करत होते. दोन वर्षांपूर्वी शहरातील मोहसीन सय्यद याच्याकडून सुमारे १३ लाख रुपयांचे डाळिंब खरेदी करून नेले होते. अखेर आता याचा तपास पूर्ण झाला आहे.

हे मसाले तुमच्या घरात आरामात पिकवता येतील, दर महिन्याला चांगली बचत होईल
गुलटेकडी मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची विक्री बंद! प्रशासनाचा निर्णय..
शेतकऱ्यांनो तयारीला लागा! राज्यात 26 जूननंतर होणार पावसाची एन्ट्री, शेतकरी सुखावला..

English Summary: 13 lakh fraud in purchase of pomegranate, one arrested
Published on: 20 June 2023, 02:13 IST